
मुरगूड प्रतिनिधी ओंकार पोतदार..
येथील नामदार चषक मॅटवरील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत खुल्या गटातील शुभम सिदनाळे , कौतुक डाफळे , मुंतजीत सरनोबत यांची नामदार चषकासाठी दावेदारी असणार आहे .
मुरगूड येथे कोल्हापूर जिल्हा व शहर कुस्ती असोसिएशनच्या मान्यतेने व मुरगूड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त नामदार चषक मॅटवरील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत शिवछत्रपती पुरस्कार विजेती नंदिनी साळोखे ( मुरगूड ), सृष्टी भोसले ( पिराचीवाडी ) ,BISF मध्ये निवड झालेले संकेत चौगले ( मुरगूड ) यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी 57 किलो गट पुढच्या फेरीत प्रवेश केलेले मल्ल : संकेत पाटील ,शुभम रानगे ,
हर्षवर्धन जाधव ,प्रवीण वडगावकर ,धनराज जमनीक , ओंकार कुंभार ,नरसिंह पाटील ,४२ किलो वजन गट : रविराज पाटील , संस्कार माने , शिवानंद मगदूम ,शुभम (बानगे), स्वराज्य कदम ,ओमकार गोबुगडे ,आदित्य मगदूम
कुस्ती बक्षीस समारंभा दिवशी मंत्री मुश्रीफ यांचा वाढदिवसानिमित्त शहर राष्ट्रवादीच्या वतीने चांदीची गदा देवून साजरा करण्यात येणार आहे . स्पर्धेत पंच म्हणून संदीप पाटील, बाबा शिरगावकर , आनंदा गोडसे , आकाश नलवडे , वैभव तेली , महेश पाटील , पांडूरंग पुजारी व निवेदक म्हणून राजाराम चौगले यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे स्वागत युवराज सूर्यवंशी प्रस्ताविक रणजित सूर्यवंशी
आभार डॉक्टर सुनिल चौगले