मलकापूर प्रतिनिधी:
बांबवडे तालुका शाहुवाडी येथील लक्ष्मण बाबुराव निकम वय वर्षे ३५ यांनी शेतातील झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसात दाखल झाली आहे.

बांबवडे येथील लक्ष्मण निकम याने आज सकाळी आपल्या शेतातील झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शेतात जाणाऱ्या लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर या घटनेची माहिती शाहूवाडी पोलिसांना कळताच शाहूवाडी पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह सेवविच्छेदनासाठी मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. सेवाविचदानानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल बाबा किटे, किरण शिंदे करीत आहेत.