Home Uncategorized उदगाव येथे अपघातात अडीच वर्षाच्या बालिकेसह दोघे ठार

उदगाव येथे अपघातात अडीच वर्षाच्या बालिकेसह दोघे ठार

2 second read
0
0
138

जयसिंगपूर : प्रतिनिधी

सांगली कोल्हापूर महामार्गावर उदगाव (ता. शिरोळ) येथील जुन्या बिल्चिंग कारखान्याजवळ दोन चारचाकी व एक दुचाकी अशा तिहेरी झालेल्या अपघातात अडीच वर्षाच्या बालिकेसह दोघे ठार झाल्याची घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. यात त्रिशा सुरेश शिंदे (वय अडीच वर्षे मूळ रा. जांभळे जयसिंगपूर सद्या रा. सांगली) व बंदेश दशरथ उळागड्डे (वय ५१ रा. कलबुर्गी कर्नाटक) हे अपघातात जागीच ठार झाल्याची घटना घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सांगली कोल्हापूर महामार्ग उदगाव येथील जुन्या बिल्चिंग कारखान्याजवळ दोन चार चाकी वाहने व एक दुचाकी वाहन असा तिहेरी अपघात झाला. त्रिशा शिंदे व बंदेश दशरथ उळागड्डे यांचा जागीच मृत्यू झाला. यात सुरज महादेव शिदे (वय ८२ रा. जयसिंगपूर सध्या रा.सांगली), शिवाणी सूरज शिंदे, (वय 23 रा.जयसिंगपुर सध्या सांगली), सौरभ संजय शिंदे (वय २४ रा. जयसिंगपूर) हे जखमी झाले आहेत. अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.

रात्री उशिरा मृतदेह जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून शिरोळ ग्रामीण रुग्णालयात शिवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तर अडीच वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याने मोठे हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी बग्यानी मोठे गर्दी केले होती. अनेकांनी बचाव कार्य करून जखमींना जयसिंगपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात केले. याबाबात जयसिंगपूर पोलिसांत रात्री उशिरापर्यंत अपघात नोंद करण्याचे काम सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…