Home वायरल येळवडेत शाळकरी मुलाचा नदीत पाय घसरुन मृत्यु.

येळवडेत शाळकरी मुलाचा नदीत पाय घसरुन मृत्यु.

10 second read
0
0
174

 राधानगरी / प्रतिनिधी

    राधानगरी तालुक्यातील  येळवडे येथील कु.श्रीधर संभाजी राबाडे (वय १५) या शाळकरी मुलाचा भोगावती नदीमध्ये पाय घसरुन पडुन मृत्यु झाला.ही घटना दुपारि एकच्या दरम्यान घडली.या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये झाली असुन घटनास्थळी पो.नि.स्वाती गायकवाड यांनी भेट देऊन माहीती घेतली.

          याबाबत मिळालेली माहीती अशी की,श्रीधर हा आपले वडील संभाजी याच्यासोबत कोदवडे येळवडे दरम्यानच्या पानंदी जवळील शेताकडे गेले होते. शेतीकाम आटोपुन श्रीधर हातपाय धुण्यासाठी दु.१ च्या दरम्यान नदीपात्रामध्ये गेला असता पाय घसरुन पाण्यात पडला, त्याला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला. त्याचा नदीपात्रामध्ये शोध घेतल्यानंतर मृतदेह सापडला.घटनास्थळी पो.नि.स्वाती गायकवाड, पो.हे.काँ.कृष्णात यादव,कृष्णात खामकर,अरविंद पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला. सोळांकुर आरोग्य केद्रामध्ये  उत्तरिय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात  देण्यात आला.या घटनेची माहीती मिळताच नदीघाटावर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…