Home Uncategorized संभाजीपूर येथे धाडसी चोरी : कॉन्ट्रॅक्टरचा बंगला फोडून १० लाखांचा मुद्देमाल लंपास..

संभाजीपूर येथे धाडसी चोरी : कॉन्ट्रॅक्टरचा बंगला फोडून १० लाखांचा मुद्देमाल लंपास..

2 second read
0
0
467

शिरोळ : संभाजीपूर (ता. शिरोळ) येथील रामलक्ष्मण नगरमधील शिंदे कॉलनीत असलेला कॉन्ट्रॅक्टर योगेश माधवराव पाटुकले यांचा बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम असा एकूण १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. या चोरीच्या घटनेमुळे संभाजीपूर व जयसिंगपुर परीसरात खळबळ उडाली आहे. याबाबतची फिर्याद योगेश पाट्रकले यांनी शिरोळ पोलिसांत दिली आहे.

रविवारी २५ फेब्रुवारी रोजी योगेश पाटुकले हे आपल्या कुटुंबियासमवेत नृसिंहवाडी येथे धार्मिक कार्य करण्यासाठी गेले होते. धार्मिक कार्य करून ते रविवारी कुरुंदवाड येथे त्यांच्या गावी गेले होते. सोमवारी रात्री कुरुंदवाडड येथून येथून ते परत संभाजीपुर येथे आल्यानंतर आपल्या बंगल्याचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले व घरात झालेल्या चोरीचा सर्व प्रकार समोर आला आहे.

अज्ञात चोरट्यांनी बंद बंगल्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूमधील लाकडी कपाट उचकटून ५ तोळ्याचे सोन्याच्या बांगड्या चार नग, ६ तोळ्याचे वजनाची चेन, ४ तोळे वजनाच्या पाटल्या, ५ तोळ्याचे सोन्याचे गंठण, २ जोड कानातील टॉप्स, ५ हजार रुपयांच्या चांदीच्या वस्तू, रोख १० हजार रुपये असा एकूण १० लाख २० हजार रुपयांचामुद्देमाल चोरट्यानी लंपास केला.

शिरोळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने, गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी जाऊन चोरीचा पंचनामा केला. पोलिसांनी चोरीच्या घटनेची माहिती घेतली. त्यानंतर करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षिरसागर यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस कर्मचाऱ्यांना तपासाबाबत योग्य त्या सूचना दिल्या.

चोरीच्या तपासासाठी पोलिसांकडून परीसरातील सर्व सीसीटीव्हीची पाहणी करण्यात येत असून चोरी प्रकरणात ३ अज्ञात चोरटे असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. चोरीचा शोध घेण्यासाठी शिरोळ पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून रवाना केली आहेत. अधिक तपास पोलिस निरीक्षक एस. एम. गायकवाड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…