मलकापूर (ता.शाहूवाडी) येथील समर्थ ग्रुप व शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.
संजय सनगर,मिलिंद सनगर,संदिप कांबळे,प्रथमेश सनगर,प्रथमेश कांबळे,अमोल पालसाडे,महेश पालसाडे,संग्राम सनगर,विनायक विभूते,मनोहर सनगर,विशाल पालसाडे,करण सनगर,प्रसाद पालसाडे यांच्यासह शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर),आघाडी प्रमुख प्रकाश पाटील (भाऊ),मलकापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर,माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील (दादा),नगरसेवक किशोर सनगर,किरण लगारे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला.