भेडसगाव (ता.शाहूवाडी) येथील शिवसेना गटाचे माजी सरपंच व राष्ट्रीय बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंदराव फाळके यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला. शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यात आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांना जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. यामुळे गट-तट सोडून शाहूवाडी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत असल्याचे माजी सरपंच व राष्ट्रीय बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंदराव फाळके यांनी सांगितले.
राज्य संघटक निलेश महापुरे,प्रसिद्धीप्रमुख दिपक सामुद्रे,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संतोष कांबळे – नेर्लेकर,मारुती फाळके – भेडसगाव,मारुती सावंत – शहापूर,संजय साठे – आवळी,बाबुराव साठे – माणगांव,मंगेश कांबळे – रेठरे,शांताराम शित्तुरकर – आकुर्ळे,भारत हिरवे – रेठरे,गौरव सावंत – शहापूर,संतोष फाळके – भेडसगाव,विकास फाळके – भेडसगाव,संतोष फाळके – भेडसगाव,सचिन कांबळे – नेर्ले,राकेश कांबळे – नेर्ले,सुरेश कांबळे – नेर्ले,संजू कांबळे – नेर्ले,राजेश कांबळे – नेर्ले,सुरेश कांबळे – नेर्ले,वसंत चव्हाण – नेर्ले,भागोजी भंडारे – नेर्ले,शंकर भंडारे – नेर्ले यांच्यासह शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरीडकर),सुखदेव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.