मलकापूर:
ब्रिटिश राजवट संपवण्यासाठी जीवाची तमा न बाळगता महात्मा गांधी, पंडित नेहरू व मौलाना नाआजाद आदि नेतृत्वाने ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड पुकारण्याचा निर्णय घेतला होता. या आंदोलन दरम्यान भारत छोडो आंदोलनाची पायाभरणी करण्यात आली. या वेळी गांधीजींनी करेंगे या मरेंगे चा नारा दिला. खऱ्या अर्थाने या आंदोलनाने भारतीय जनतेला एकत्र आणले व स्वातंत्र्याच्या लढ्यात नवचैतन्य निर्माण केले. देशाला स्वतंत्र मिळण्यासाठी हजारो हुतात्म्यांनी प्राणांची पर्वा न करता आहुती दिली. अनेकांच्या बलिदानाने, प्राणाने, त्यागाने, बुद्धीने व प्रबोधनाने देश स्वतंत्र झाला आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. जे.एस. इंगळे यांनी केले.
मलकापूर -पेरीड येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात क्रांती दिनाचे औचित्य साधून प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की भारताला शौर्याचा आणि बलिदानाचा मोठा इतिहास आहे.निस्वार्थी लोकांच्या त्यागातून भारत उभा राहिला आहे म्हणूनच देशप्रेम, देशनिष्ठा व देशहित या गोष्टीचा विचार सातत्याने प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला विभागप्रमुख प्रो. डॉ. एस. के. खोत हे होते.

सदर कार्यक्रम इतिहास विभाग आयोजित होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व प्रमुख वक्त्यांचा परिचय इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ.चंद्रकांत गिरी यांनी करून दिला तर आभार इतिहास विभागातील प्रा. ए. एस. जाधव यांनी मानले. सदर वेळी वाणिज्य विभाग विभाग प्रमुख प्रा. आर.एस. सुतार व विज्ञान विभाग प्रमुख प्रो. डॉ. संतोषकुमार पोरे तसेच प्रा.डी.डी.ढेरे प्रा. एस. ए. हुपरीकर प्रा. व्ही. एस. फडतरे, प्रा. ए. आर. चव्हाण यांची उपस्थिती लाभली होती.