Home Uncategorized श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

6 second read
0
0
128

मलकापूर प्रतिनिधी:

श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ वारणानगर संचलित श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालय येलूर – मलकापूर , ता. शाहूवाडी, जि.कोल्हापूर, येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला. ध्वजारोहण मलकापूर नगरीतील विद्यार्थिनी कुमारी नम्रता प्रवीण पाटील हिच्या हस्ते करण्यात आले. कुमारी नम्रता हिने अलीकडेच IBPS मार्फत घेण्यात आलेल्या बँकिंग स्पर्धा परीक्षेत आयडीबीआय बँक ज्युनि. असिस्टंट मॅनेजर व आयडीबीआय बँक एक्झिक्यूटिव्ह या दोन्ही परीक्षेत यश संपादन केले आहे.

सदर कार्यक्रमास कुमारी नम्रता हिच्यासह तिचे वडील मलकापुरातील प्रसिद्ध उद्योजक माननीय प्रवीण पाटील ही उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमात ध्वज समारंभाचे पूजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही एस पाटील यांनी केले तर ध्वजारोहण प्रमुख अतिथी कुमारी नम्रता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नम्रता हिने महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन व स्वतः कमी वयात कशी घडली. MPSC, UPSC, IBPS यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेची माहिती व परीक्षेत यशस्वी होण्याची काही तंत्रे सांगितली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रा.प्राचार्य आदरणीय डॉ. व्ही. एस. पाटील सर उपस्थित होते. विद्यार्थिनींना देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक शूरवीरांचे व स्वातंत्र्य सेनानींचे बलिदान कमी आले असून यातूनच आजचे स्वातंत्र्य निर्माण झाले आहे, म्हणूनच संविधानाने आपल्याला दिलेले हक्क माहीत करून घेताना कर्तव्याची जाणीवही चांगल्या पद्धतीची असावी हे सांगितले.

शाहूवाडी तालुका स्पर्धापरीक्षा बाबतीत अग्रेसर आहे व विद्यार्थिनींनी स्पर्धा परीक्षा व आयबीपीएस परीक्षांचा अभ्यास महाविद्यालयीन स्तरापासूनच सुरू केल्यास यश निश्चित मिळते अशी ग्वाही दिली. सदर कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख समन्वयक प्रा. प्रशांत कांबळे,कला विभागाचे समन्वयक प्रा. आर. एस. पाटील,कॉमर्स विभागाचे समन्वयक प्रा. श्रीमती आर. एस. लाड व विज्ञान विभागाच्या समन्वयक प्रा.श्रीमती ए. बी. पवार मॅडम यांनी केले.आजच्या कार्यकामाचे प्रास्ताविक स्वागत प्रा आर. एस पाटील सरांनी केले. व सूत्रसंचालन प्रा. पी. जे. कांबळे सरांनी केले. या कार्यक्रमामध्ये देशभक्तीपर गीतांचे व स्वातंत्र्य गीताचे समूह गायन स्पर्धा व वतृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मुलींनी अतिशय चांगल्या व उत्कृष्ट प्रकारे गायन केले.या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…