Home Uncategorized रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघाने शेतकऱ्यांचा विश्वास जोपासला – मा.नाम.हसन मुश्रीफसो (वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री)

रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघाने शेतकऱ्यांचा विश्वास जोपासला – मा.नाम.हसन मुश्रीफसो (वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री)

14 second read
0
1
1,193

कोल्हापूर : रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघ मर्यादित, कोल्हापूर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतीनिष्ठ शेतकरी रयत सेवा गौरव पुरस्कार वितरण व रयत संघास इफको ड्रोन फवारणी यंत्र, प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र हस्तांतर कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री नाम. हसन मुश्रीफसो यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार पी.एन.पाटीलसो, आमदार सतेज उर्फ बंडी डी.पाटीलसो यांच्या प्रमुख उपस्थित व गोकुळचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थित पाडळी खुर्द ता.करवीर येथे संपन्न झाला.

यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री नाम. हसन मुश्रीफसो म्हणाले कि,रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघ स्व.श्रीपतराव बोंद्रे दादांनी या संघाची स्थापना केली आणि सहकार महर्षी स्व.एस.आर.पाटील यांनी संघाची धुरावाहिली पुढे त्यानंतर श्री. विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघाने सहकाराच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात दिलेले योगदान हे दीपस्तंभाप्रमाणे आहे. सध्या खरेदी विक्री संघाच्या मिश्र खताच्या निर्मितीमध्ये तसेच अनेक अडी अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. खरेदी विक्री संघाने मिश्र खतावर अवलंबून न राहता भविष्य काळामध्ये आपल्याला नवनवीन क्षेत्रांमध्ये भाग घेऊन उत्पादन वाढीचे कृषी क्षेत्रातील स्रोत निर्माण केले पाहिजे. कृषी क्षेत्रातही स्पर्धा वाढली आहे. संघानी कृषी सेवा केंद्रे स्थापन करून जो बांधावर जाईल, तोच शेतकऱ्यांचा खरा मार्गदर्शक आणि सहकारी होईल. भविष्यात रयत सेवा कृषी संघाचे ही नेत्रदीपक प्रगती अशीच चालू राहावी असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी बोलताना करवीरचे आमदार पी. एन. पाटील म्हणाले कि, स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे दादा आणि स्वर्गीय एस. आर. पाटील यांनी घालून दिलेला पायंडाच या संघाच्या प्रगतीचा मूलमंत्र आहे. शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या कृषीविषयक सेवा-सुविधा देण्याचे काम रयत सेवा कृषी उद्योग संघ निरंतरपणे करीत असून दर्जा आणि गुणवत्तेच्या जोरावर रयत संघाने आपली विश्वासार्हता आज तागायत जोपासली आहे असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी बोलताना आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटीलसो म्हणाले कि, या जिल्ह्यात आतापर्यंत अनेक खरेदी विक्री संघ निघाले. परंतु; सध्याच्या शेती व्यवसायमध्ये नवनवीन संकल्पना राबवून आधुनिक तंत्रज्ञानाच वापर करून उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. रयत सेवा कृषी उद्योग संघाचा कारभार शेतीभिमुख असून रयत संघ हा करवीर तालुक्याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार याप्रसंगी काढले.रयत संघाच्या शेतीनिष्ठ पुरस्कार विजेत्यांनी आपल्या गावमध्ये पिक उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करावे असे आवाहन यावेळी केले. रयत सेवा कृषी उद्योग संघामार्फत शेतीसाठी ड्रोन द्वारे औषध फवारणी हा प्रयोग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच केला असून निश्चितपणे चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद त्यांना येणाऱ्या भविष्यकाळात मिळेल हा विश्वास व्यक्त केला.

यावेळी बोलताना रयत संघाचे मार्गदर्शक गोकुळचे जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील म्हणाले कि, स्व. श्रीपतराव बोंद्रे दादा, स्व.एस.आर.पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत सेवा कृषी उद्योग संघाच्या स्थापनेस ६२ वर्ष पूर्ण झाली आहेत.त्यांनी घालून दिलेल्या मूल्यांच्या आधारे संघाची प्रगतीपथाचे वाटचाल चालू असून भविष्यात हि राहील असे मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलेले विविध पुरस्कारांचे मानकरी असे….,रयत सेवा पुरस्काराचे मानकरी: श्रीमती सुलभा श्रीकांत कुलकर्णी- वळीवडे, शिवाजी शामराव पाटील -कोथळी, शामराव तुकाराम भोगम- भोगमवाडी, राजेंद्र अण्णासाहेब पाटील- शिरोली दुमाला, बंडा दत्तू पाटील- खुपिरे, विष्णू पांडुरंग पाटील -कुडित्रे.

सहकार कार्यकर्ते मानकरी: श्रीपती बापू पाटील -निगवे खालसा, ज्ञानदेव रामचंद्र देसाई -आरळे, सर्जेराव दिनकर जरग- महे, शिरीष अण्णासाहेब देसाई- पट्टणकोडोली, लहू गोपाळा बाटे- बोलोली, सीमा सर्जेराव चाबूक -सांगरूळ. आदर्श सचिव: मनोज पांडुरंग माने- गणेशवाडी.उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत संघाचे अध्यक्ष सचिन विश्वासराव पाटील यांनी केले. प्रास्ताविक संघाचे संस्थापक संचालक विश्वास नारायण पाटील -आबाजी यांनी केले. सूत्रसंचालन एम. पी. पाटील- कावणेकर यांनी केले. आभार संघाचे उपाध्यक्ष शिवाजी देसाई यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक शशिकांत पाटील- चुयेकर, यशवंत बँक चेअरमन महेश पाटील, वीरशैव बँकेचे संचालक अनिल सोलापुरे, बी. ए. पाटील, नंदकुमार पाटील, कोल्हापूर जिल्हा कृषी अधीक्षक अरुण भिंगारदिवे, मधुकर जांभळे आदी प्रमुखांसह संघाचे संचालक मंडळ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…