मलकापूर प्रतिनिधी शिक्षण विभाग पंचायत समिती शाहूवाडी यांच्यामार्फत शाहूवाडी तालुका स्तरीय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये केंद्रीय प्राथमिक शाळा परळे निनाई या शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला. हा कार्यक्रम दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी बांबवडे या ठिकाणी पार पडला. संगीताची साथ ही शाळेचे माजी विद्यार्थी मिलिंद घोलप यांनी दिली. यावेळी शाळेचे शिक्षक आवळे, लोहार व शिक्षिका घोलप या उपस्थित होत्या. मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते
तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये परळे निनाई शाळेचा द्वितीय क्रमांक