Home Uncategorized शालेय वयातच मुलांवर राजर्षी शाहूंच्या विचारांचे बीजारोपण करण्यात शाहू छत्रपती फौंडेशनचे योगदान मोलाचे – डॉ. जयसिंगराव पवार

शालेय वयातच मुलांवर राजर्षी शाहूंच्या विचारांचे बीजारोपण करण्यात शाहू छत्रपती फौंडेशनचे योगदान मोलाचे – डॉ. जयसिंगराव पवार

4 second read
0
0
72

कोल्हापूर : शालेय वयातच राजर्षी शाहूंच्या विचारांचे बीजारोपण शालेय विद्यार्थ्यांवर करण्यात शाहू छत्रपती फौंडेशन यशस्वी ठरले आहे. राजर्षी शाहूंच्या विचारांचे ‘खरे बारसदार’ म्हणून या संस्थेच्या कार्यकत्यांचा मला अभिमान आहे.’ असे गौरवोद्‌गार ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी येथे बोलताना काढले.

शाहू छत्रपती फौंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राजर्षी शाहू विचार व प्रचार परीक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ शाहू स्मारक भवनात झाला. या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानावर प्रा. डॉ. जयसिंगराव पवार बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे विश्वस्त, उद्योगपती एम.बी. शेख, राधानगरीच्या तहसिलदार सौ. अनिता देशमुख, पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील, इतिहास संशोधक प्रा. डॉ. राजेंद्र घाडगे, कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले ग्रामसेवक शंकरराव केंबळकर, शाहू छत्रपती फौंडेशनचे अध्यक्ष प्रा. जॉर्ज क्रुझ, सचिव जावेद मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

यावेळी बोलताना राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी स्पर्धा परीक्षेसाठीची पूर्वतयारी म्हणून शाहू छत्रपती फौंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या राजर्षी शाहू विचार प्रचार परीक्षेचा समावेश करावा लागेल, असे मत व्यक्त केले, रयत शिक्षण संस्थेचे विश्वस्त एम. बी. शेख यांनी आपण ज्या संस्थेत शिकलो आणि ज्या रयत शिक्षण संस्थेत विश्वस्त म्हणून काम करता आहे, त्या संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील राजर्षी शाहूंना गुरूस्थानी मानत होते. अशा राजर्षी शाहूंचा विचार तळागळापर्यंत पोहोचण्यात शाहू छत्रपती फौंडेशन यशस्वी ठरल्याचे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमात फौंडेशनचे संचालक नवाब शेख यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा सचिवपदी निवड झाल्याबद्दल तर निसार मुजावर यांची नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज या संघटनेच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी श्री. राजेंद्र घाडगे, पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील, प्रा. जॉर्ज क्रुझ यांची मनोगते झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…