Home Uncategorized शिवाजी विद्यापीठ अंतर विभागीय बेसबॉल स्पर्धा

शिवाजी विद्यापीठ अंतर विभागीय बेसबॉल स्पर्धा

4 second read
0
0
71

मलकापूर प्रतिनिधी:

पेरीड – मलकापूर येथील प्रा. डॉ. एन डी. पाटील महाविद्यालय, मलकापूर-पेरीड आयोजित शिवाजी विद्यापीठ अंतर विभागीय बेसबॉल (पुरुष) स्पर्धा 2023-24 यशस्वीरीत्या संपन्न झाल्या. २ दिवस चाललेल्या बेसबॉल पुरुष स्पर्धा मध्ये महावीर महविद्यालय च्या संघाने प्रथम क्रमांक, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयने दुसरा क्रमांक, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पलुस याने तिसरा क्रमांक घेऊन हे विजयी ठरले. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ साठी प्राचार्य डॉ. टी. एन. घोलप, शिवाजी विद्यापठाचे निवड समिती अध्यक्ष प्रा. संदेश दोंडे, निवड समिती सदस्य प्रा. रोहित पाटील, निवड समिती सदस्य व स्पर्धा प्रमुख प्रा. सुहास वाघ, प्रा. नामदेव अडनाईक, प्रा. चंद्रकात गिरी, प्रा. विजय रानमाळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य, टी. एन. घोलप यांनी स्पर्धेत विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन केले. जे खेळाडू शिवाजी विद्यापीठ संघासाठी निवड होऊन पुढे जातील त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. ज्या खेळाडूची निवड झालेले नाही त्यानी निराश न होता पुढील वर्षी आपला खेळ अजून चांगला कसा होईल यावर लक्ष केंद्रित करून अजून तयारीला लागावे असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मलकापूर येथे एस.टी. बसथांबा व रात्री १० वाजेची बससेवा सुरू करण्याची मागणी

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते: मलकापूर शहरातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, महिला व ज्येष…