Home Uncategorized परशुराम च्या माजी विद्यार्थ्यांनी जपली शाळेबद्दल कृतज्ञता…

परशुराम च्या माजी विद्यार्थ्यांनी जपली शाळेबद्दल कृतज्ञता…

3 second read
0
0
52

परशुराम विद्यालयाचे माजी विद्यार्थी नेहमीच आपल्या शाळेबद्दल विविध प्रकारची मदत देऊन आपल्याला शाळेबद्दल असलेली आपुलकी व्यक्त करत असतात. आज परशुराम विद्यालयातील दहावी ची 2012/2013 च्या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी आपण ज्या शाळेचे काहीतरी देणे लागतो या भावनेने शाळेस आज दहा कुंड्या रोपांसह दिल्या.

तसेच शाळा रंगरंगोटी सुशोभीकरण कामासाठी रोख 5000/ रुपये जमा केले असून तीही रक्कम मुख्याध्यापक रंगराव गोसावी सर यांच्याकडे सुपूर्द केली .यावेळी विद्यालयाचे प्राचार्य रंगराव गोसावी यांनी विद्यार्थ्यांना धन्यवाद देऊन या विद्यार्थ्यांनी आजच्या विद्यार्थ्यां समोर एक आदर्श निर्माण केला अशी भावना व्यक्त केली.

यावेळी या बॅचचे प्रतिनिधी हर्षद सुर्यवंशी, ओमकार पांगळे,आकाश सावंत , प्राचार्य गोसावी सर, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील, गिरीश प्रभूलकर,जावेद अत्तार यांचेसह शिक्षक वर्ग हे ही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…