कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्यासह रॉयल फॅमिलीतील माजी खासदार युवराज संभाजी राजे, युवराज मालोजीराजे, संयोगिता राजे, मधुरिमा राजे यांनी कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात प्रचाराचा झंझावात निर्माण केला आहे. युवराज मालोजीराजे यांनी मंगळवारी मोटरसायकलीवरून मंगळवार पेठेतील तालमी, मंदिरे, व्यापारी, उद्योजक, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्या घरी भेट देऊन कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू छत्रपतींना विजयी आवाहन केले. …
मोटरसायकलवरून मालोजीराजेंच्या मंगळवार पेठेत गाठीभेटी… तालमींनी दिला महाराजांच्या विजयाचा शब्द