Home Uncategorized कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा उमेदवारी अर्जासाठी आज अखेरचे चार तास

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा उमेदवारी अर्जासाठी आज अखेरचे चार तास

3 second read
0
0
417

१९ एप्रिल २०२४

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी (दि. १९) अखेरचा दिवस आहे. या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज भरता येणार आहेत. दरम्यान गुरुवारी कोल्हापूरसाठी १२ उमेदवारांनी १६ तर हातकणंगलेसाठी १४ उमेदवारांनी १७ अर्ज दाखल केले. शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील आणि महायुतीचे कोल्हापूरचे उमेदवार खा. संजय मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक यांनीही आज अर्ज दाखल केले.

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. शुक्रवार (दि. १९) अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिवस आहे. शनिवारी (दि. २०) दाखल उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. सोमवारी (दि. २२) दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…