Home Uncategorized राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

3 second read
0
0
170

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तसेच राधानगरी तालुका दूध संस्थांची पतसंस्थेचे चेअरमन श्री अभिषेक अरुण डोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त घोटवडे येथे आज विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासत सध्या भेडसावत असलेल्या रक्ताचा तुटवडा यावरती उपाय म्हणून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिवर्षी अभिषेक डोंगळे युवाशक्तीच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते तसे ते यावर्षी देखील आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये 185 रक्तदात्यांनी जीवनधारा व संजीवनी ब्लड सेंटर यांचेकडे रक्तदान केले

यासोबतच घोटवडे येथील स्वयंभू मंदिरात भक्तांना मंदिर आवारात बसवण्यात आलेल्या फरश्या उन्हाने तापल्यामुळे भक्तांना त्रास होत होता त्यासाठी अभिषेक डोंगळे युवाशक्तीच्या वतीने मंदिरात फरशीवर टाकण्यासाठी मॅट भेट देण्यात आले.

वाढदिवसानिमित्त घोटवडे येथे घोडा गाडी, दुका गाडी, बैलगाडी अशा विविध स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आल्या होत्या त्यामध्ये विजेते झालेले गाडीवान यांना रोख रक्कम व ढाल भेट देणेत आली अभिषेक डोंगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध स्तरातून मोठ्या प्रमाणात लोकांनी खास करून युवकांनी गर्दी केली होती

यामध्ये गोकुळ संचालक किसन चौगले, अभिजीत तायशेटे,प्रकाश पाटील, भोगावती चेअरमन शिवाजीराव पाटील, व्हा.चेअरमन राजाराम कवडे, संचालक धीरज डोंगळे, धैर्यशील पाटील कौलवकर, मानसिंग पाटील, रवींद्र पाटील,तानाजी काटकर,बिद्री संचालक राजाराम भाटले, सर्जेराव कवडे,दत्ता हालके हसन राऊत शांताराम बुगडे मोहन धुंदरे इतर मान्यवर लोकांचा समावेश होता.तसेच दुरध्वनीवरुन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,पालकमंत्री हसन मुश्रीफ,माजी आमदार के.पी.पाटील, युवक राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण अदीनी शुभेच्छा दिल्या.. वाढदिवसाला शुभेच्छा देणेसाठी हार बुके आणून नाहक खर्च करण्यापेक्षा वह्या आणाव्यात असे आवाहन अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या वतीने करण्यात आले होते त्याला देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला यावेळी संकलित झालेल्या १० हजार वह्या राधानगरी तालुक्यातील दुर्गम भागातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…