कोल्हापूरःता.२३.कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्यावतीने ताराबाई पार्क कार्यालयाच्या आवारातील श्री हनुमान मंदिर येथे हनुमान जयंती भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते श्री हनुमान मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संघाचे संचालक बाबासाहेब चौगले व त्यांच्या पत्नी सौ.विजयमाला चौगले यांच्या हस्ते उत्सवमूर्तीस रूद्र अभिषेक व इतर धार्मिक विधी करण्यात आले. श्री हनुमान जन्मकाळा निमित्त उपस्थित महिलांनी पाळणा म्हटला.यावेळी भजन व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे,जेष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील चुयेकर, अंबरिषसिंह घाटगे, बाळासाहेब खाडे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, अमृता डोंगळे,पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंखे, संकलन व्यवस्थापक एस.व्ही. तुरंबेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अशोक पुणेकर, अशोक पाटील, बाजीराव पाटील, निवास पाटील, बाळासो वायदंडे, संकेत खाडे, मानसिंग खाडे, विनोद पाटील, बाळासो खांडेकर व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.