
शिरोळ : प्रतिनिधी
आलास जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदार संघात भाजपचे जि.प.उमेदवार प्रशांत शहापूरे, आलास पं.स.चे उमेदवार गुरुदास खोचरे हे निवडणूक लढत आहेत. सध्याचे चित्र पाहता आलास मतदार संघात एकूण ९ गावे येतात. गेली ३५ वर्षे या मतदार संघात औरवाडसोडून इतर कोणत्याही गावाला विचारात घेतले जात नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे याचा ८ गावांनी यावेळी प्रशांत शहापूरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे राहण्याचा निर्धार केल्याचे दिसत आहे.

पंचायत समितीसाठी गुरुदास खोचरे हे नृसिंहवाडी, औरवाड, गौरवाड, बुबनाळ, आलास ही गावे आलास पंचायत समितीत येत असून गुरुदास खोचरे यांना यावेळी या गावातून भरघोस पाठींबा मिळत आहे. त्यामुळे राजर्षी शाहू विकास आघाडी व काँग्रेसपुढे एक तगडे आव्हान त्यांनी उभे केले आहे. गुरुदास खोचरे यावेळी विजयी होतील, असे चित्र दिसत आहे.

आलास जि.प. मतदार संघात प्रशांत शहापूरे हे सर्वसाधारण आरक्षित जागी लढत आहे. त्यांच्याविरुध्द औरवाडमधील ओबीसी घटकातीलच उमेदवार दिल्यामुळे बहुजन समाजात याबद्दल तीव्र नाराजी दिसत आहे. राजर्षी शाहू विकास आघाडी आणि काँग्रेसने गेल्या ३५ वर्षात या मतदार संघात मतांचे राजकारण करुन स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आहे. इतर गावांचा विचार केला गेला नाही. यावेळी प्रशांत शहापूरे, गुरुदास खोचरे यांना निवडून आणण्यासाठी चांगलीच यंत्रणा भाजपने राबवली आहे.


