Home Uncategorized आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत समरजितसिंह दळवी याला सुवर्णपदक

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत समरजितसिंह दळवी याला सुवर्णपदक

4 second read
0
0
74

पन्हाळा : गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत पन्हाळा येथील समरजितसिंह राजेंद्र दळवी याने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. त्याची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील इंडो नेपाळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली शोतोकन कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित दहावी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा १ फेब्रुवारी रोजी पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हापसा (गोवा) येथे पार पडली. या स्पर्धेत विविध देशांतील विविध राज्यातून खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
समरजितसिंह दळवी याने या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत दमदार खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. यापूर्वी त्याने वर्ल्ड फेडकेट फेडरेशनच्या ११ व्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत तसेच कोल्हापूर येथील कसबा बावडा परिसरातील श्रीराम सांस्कृतिक भवनात झालेल्या १३ व्या राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदक मिळवले आहे.
अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत तीन सुवर्णपदके पटकावल्याने समरजितसिंहच्या यशाची सर्वत्र चर्चा होत असून पन्हाळा तालुका व परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या यशामागे त्याचे प्रशिक्षक निलेश पोवार वडिल राजेंद्र दळवी व चुलते अमितकुमार दळवी यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

पन्हाळा प्रतिनिधी- सचिन वरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…