खरीप हंगामातील पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिकांची वाढ खुंटून अनेक ठिकाणी पिके वाळली आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी तसेच सांगली जिल्ह्यातील शिराळा व वाळवा या पाच तालुक्यांचा ‘ट्रिगर-१’ (प्रथम कळ) लागू झालेल्या तालुक्यांमध्ये समावेश करून दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना विविध सवलती व उपाययोजना लागू कराव्यात, अशी मागणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व …