लोकशाहीमध्ये तत्वाचा विरोध असावा निवडणुकीमध्ये विरोध असावा परंतु गावच्या सर्वांगीण विकासासाठी कोणीही केव्हाही विकास कामासाठी प्रस्ताव मागत असेल तर ग्रामपंचायत ते कर्तव्य आहे तो ठराव देणे. सत्तांतर होऊन एखादी पार्टी सत्तेत आली असेल तर त्यांनी विरोधकांच्या ठरावाला विरोध करणे लोकशाहीच्या विरोध आहे ग्रामपंचायत अधिनियम 39 नुसार विरोध करणार यांच्या वरती ग्रामपंचायत विरोध कमिशनर कडे अपील करता येते. असे प्रतिपादन आमदार विनय रावजी कोरे यांनी शाहूवाडी येथे जनस्वराज्य पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कृष्णात पाटील यांनी आंदोलन केले होते त्या आंदोलनाची सांगता समारंभ झाला त्याप्रसंगी ते प्रसार माध्यमाची बोलत होते.
प्रारंभी सरबत देऊन कृष्णा पाटील यांनी अमरण उपोषण स्वीकारले होते ते आज विनय कोरे यांच्या हस्ते सोडण्यात आले. यावेळी ते बोलताना म्हणाले सरूड तालुका शाहूवाडी येथेही एका ग्रामपंचायत सदस्यांनी सत्ताधाऱ्यांच्याकडे विकास कामासाठी ठराव मागितला होता तेथे असाच प्रकार झाला हा प्रकार दुर्देवी आहे.
शाहुवाडी तालुक्यांमध्ये आता विकास कामासाठी कोणीही ठराव मागितला तर त्याला द्यावी अशी लोकांची मानसिकता बदलत चालली आहे. परंतु विरळे तालुका शाहूवाडी येथील तांडावस्तीतून सुचवलेली व जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून क्रीडांगणाबाबत काही कामे आपल्या कार्यकर्त्यांनी सुचवली होती याला सत्ताधारी विरोध करतात हे अत्यंत चुकीचे राजकारण आहे. कृष्णात पाटील व ग्रामस्थ यांच्या पाठीशी आपण ठाम असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. यावेळी जि.प. सदस्य बांधकाम सभापती सर्जेराव पाटील (पेरीडकर), बयाजी पाटील, काणसाखोरा फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील आधी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.



