Home Uncategorized मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेले १० दिवस सुरू असलेले राजेंद्र तोरस्कर यांचे आमरण उपोषण खासदार धनंजय महाडिक यांच्या आश्‍वासनानंतर स्थगित

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेले १० दिवस सुरू असलेले राजेंद्र तोरस्कर यांचे आमरण उपोषण खासदार धनंजय महाडिक यांच्या आश्‍वासनानंतर स्थगित

6 second read
0
0
1,294

न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत. मराठा समाजाच्या भावना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवण्याचे आश्‍वासन खासदार महाडिक यांनी दिल्याने, हिंदू महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तोरस्कर यांचे १० दिवस सुरू असलेले आमरण उपोषण स्थगित करण्यात आले.


मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तोरस्कर यांनी, १ ऑक्टोबर पासून दसरा चौकात आमरण उपोषणाला सुरूवात केली. शासनाने ठोस निर्णय दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. दरम्यान विविध पक्ष, संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी तोरस्कर यांच्या उपोषणाला पाठींबा दिला होता. प्रकृती खालावली तरी तोरस्कर यांनी उपोषण सोडणार नाही, अशी ठाम भुमिका घेतली होती. त्यानंतर विविध संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी खासदार धनंजय महाडिक यांच्याशी संपर्क साधून, राजेंद्र तोरस्कर यांनी उपोषण स्थगित करावे, यासाठी मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार खासदार धनंजय महाडिक यांनी, आज दुपारी उपोषण स्थळी जावून, तोरस्कर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना समजून घेवून, आरक्षण प्रश्‍नी लवकरच तोडगा निघेल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. खासदार महाडिक यांच्या आश्‍वासनानंतर तोरस्कर यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याच हस्ते सरबत देवून, उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नियोजन मंडळाचे सदस्य सत्यजीत कदम, प्रा. जयंत पाटील, बंडा साळोखे, किशोर घाटगे, विशाल शिराळकर, दिपाली खाडे, प्रसाद जाधव, अनिरूध्द कोल्हापुरे, आप्पा लाड, दिपक जाधव, मनोहर सोरप, अवधुत भाटे, सुहास सामंत, कमलाकर किलकिले यांच्यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…