Home राजकारण भोगावती साखर कारखाना निवडणुकीचे बिगुल वाजलेसंचालक मंडळाची संख्या 21 वरून आता 25 वर

भोगावती साखर कारखाना निवडणुकीचे बिगुल वाजलेसंचालक मंडळाची संख्या 21 वरून आता 25 वर

2 second read
0
3
505

भोगावती सहकारी साखर कारखाना शाहूनगर परिते तालुका करवीर संचालक मंडळाची संख्या आता 21 वरून 25 इतकी झाली आहे. करवीर तालुका आणि राधानगरी तालुका असे या कारखान्याचे क्षेत्र कार्यक्षेत्र आहे.
भोगावती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया आता सुरू झाली आहे नव्या 97 व्या घटनादुरुस्ती पोट नियम 26 अनुसार संचालक मंडळाची संख्या आता वाढवण्यात आलेली आहे यामध्ये संस्था गट रद्द करण्यात आलेला असून घटनादुरुस्तीनुसार संस्था मतदारांना 25 मताचा अधिकार मिळणार आहे. उत्पादक गटातून राधानगरी तालुक्यातील कौलव गट 3, राशिवडे बुद्रुक गट 4, कसबा तारळे गट 3, तर करवीर तालुक्यातून कुरुकली गटातून 4, सडोली खालसा गटातून 4, तर हसूर दुमाला गटातून 2 अशी एकूण 20 संचालक निवडून द्यायची संख्या असणार आहे.

तर अनुसूचित जाती जमाती 1 महिला प्रतिनिधी 2 इतर मागास प्रतिनिधी 1 भटक्या जाती जमाती, विशेष मागास प्रतिनिधी 1 याप्रमाणे 5 संचालक निवडले जाणार आहेत त्यामुळे 21 संचालक मंडळ ऐवजी आता संचालक संख्या ही 25 इतकी होणार आहे याव्यतिरिक्त तज्ञ संचालक 2 आणि कार्यलक्षी म्हणजेच कामगार प्रतिनिधी संख्या 2 अशा पद्धतीचे असणार आहे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…