
मिलिंद कांबळे (राधानगरी प्रतिनिधी)
2025 ते 2030 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी राधानगरी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहेत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आदेशानुसार या आरक्षण जाहीर करण्यात आले. राधानगरी तालुक्यातील एकूण 98 सरपंच पदासाठी आरक्षण सोडत सोमवारी पंचायत समितीच्या राजर्षी शाहू सभागृहात पार पडली. यावेळी तहसीलदार अनिता देशमुख नायक ,तहसीलदार बिपिन लोकरे, महसूल सहाय्यक प्रीतम हिंगमिरे ,निवडणूक ऑपरेटर सचिन पाटील यांना प्राधिकृत करण्यात आले होते .अनुसूचित जातीसाठी 11 यामध्ये पुरुष सहा तर महिला पाच, नागरिकांचा मागास प्रवर्ग मध्ये एकूण 27 यामध्ये पुरुष 13 तर महिला 14 आणि सर्वसाधारण गटासाठी 60 यामध्ये पुरुष 30 तर महिला 30 असे पदे आरक्षित करण्यात आली होती दुपारी साडेबारा वाजता आरक्षणाच्या सोडतीच्या चिट्ट्या दुर्वा टिपूगडे आणि विहान भोगुलकर या विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आल्या. यामध्ये अनुसूचित जातीसाठी तारळे खुर्द ,धामोड, ओळवण ,गुडाळ- गुडाळवाडी, बुजवडे ,बुरंबाळी ,अनुसूचित जाती राखीव महिलांसाठी कोते,कोदवडे, कपिलेश्वर, आटेगाव , पडळी नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये सावर्डे ,शेळेवाडी, पाटपन्हाळा, खिंडीव्हरवडे, मालवे, वाघवडे ,तीटवे, अर्जुनवाडा , म्हसुर्ली ,शिरसे, आकनूर ,खामकरवाडी, धामणवाडी, राशीवडे खुर्द, चापोडी तर्फ तारळे, गवशी, राधानगरी ,शिरगाव ,आवळी खुर्द ,कोनोली तर्फ असंदोली, मानबेट , सोळांकुर, मोघर्डे, सरवडे ,तळेगाव, मांगोली, पालकर वाडी आणि सर्वसाधारण महिला राखीसाठी पनोरी, मोहडे ,करंजफेन, न्यू करंजे, चंद्रे ,मल्लेवाडी , कुडुत्री, तळाशी, टिक्पुर्ली ,अनाजे ,तुरंबे येळवडे ,सावर्डे ,वडाचीवाडी मांगेवाडी चापोडी तर्फ ऐनघोल केळोशी खुर्द चक्रेश्वर वाडी बारडवाडी बर्गेवाडी देंगेवाडी हसणे कांबळवाडी कार्यवडे कुंभारवाडी पिंपळवाडी रामवाडी सोळंबी कौलव घोटावडे आणि आपटाळ त्याचबरोबर सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी तरसंबळे, माजगाव ,आईनी ,अडोली, आवळी बुद्रुक ,चांदे ,नरतवडे फेजवडे ,सोन्याची शिरोली, कसबा वाळवे ,कसबा तारळे, कासारपुतळे ,मौजे कासारवाडा, दुर्गमानवाड ,पुंगाव फराळे, पिरळ, सावर्द ,पडसाळी, पंडेवाडी राजापूर ,बनाची वाडी ,कंठेवाडी, कळंकवाडी, मजरे कासारवाडा, गुडेवाडी, चांदेकरवाडी, खेळेवाडी, मुसळवाडी ,आमजाई वरवडे, केळोशी बुद्रुक, राशिवडे बुद्रुक, असे आरक्षण देण्यात आले या सोडतीसाठी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य उपस्थित होते आगामी पाच वर्षांसाठी तालुक्यातील ग्रामपंचायतचे सरपंच पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित झालेले आहे हे स्पष्ट झाल्याने अनेक इच्छुकांच्या चेहऱ्यावर उत्साह पाहायला मिळतोय.


