Home Uncategorized जावयाचा रद्द झालेला पॅकींग ठेका आणि बंद झालेले ४५ टँकर यामुळेच महाडीकांचे गोकुळवर आरोप किकवीच्या प्लांटमुळे गोकूळची ४ कोटी ची बचतच… गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांची माहिती…

जावयाचा रद्द झालेला पॅकींग ठेका आणि बंद झालेले ४५ टँकर यामुळेच महाडीकांचे गोकुळवर आरोप किकवीच्या प्लांटमुळे गोकूळची ४ कोटी ची बचतच… गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांची माहिती…

1 min read
0
0
2,080

कोल्हापूर ता. ३१ : महाडीकांचे जावई विजय ढेरे यांच्या मालकीच्या पुणे  येथील मांजरी बु येथील गायत्री कोल्ड स्टोरेज या दूध पॅकींग एजन्सी ऐवजी किकवी येथील अनंत डेअरी यांना दूध पॅकींगचा ठेका दिल्यामुळे गोकुळ दूध संघाची जवळपास वार्षिक ४ कोटी रुपये बचत होत आहे. असे असले तरी केवळ जावयाचा दूध पॅकींगचा ठेका रद्द झाला आणि महाडिकांचे दूध संघातील ४५ टँकर बंद केल्याने होणारा आर्थिक फायदा थांबला, या कारणामुळेच शौमिका महाडीक ह्या गोकुळ दूध संघावर आरोप करत सुटल्या आहेत. गोकुळच्या दूध संकलनामध्ये घट झालेली नसून गतवर्षीच्या तुलनेत प्रतिदिन ५० हजार लिटर इतकी वाढ झाली आहे. तसेच मुंबईतील दुध विक्रीमध्ये गतवर्षाच्या तुलनेत वार्षिक ६९ लाख लिटरची वाढ झालेली आहे. पशुखाद्य विक्रीमध्ये वर्षाला १४ टक्के इतकी वाढ झालेली आहे. सध्या गोकुळ समोर अमुल सारख्या ब्रँडचे आव्हान असताना गोकुळ टिकावा आणि वाढावा तसेच कष्टकरी दूध उत्पादकांना जास्तीत-जास्त फायदा व्हावा यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. गोकुळबाबत वस्तुस्थिती माहित असून सुध्दा चूकीची माहिती देवून दूध उत्पादकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न शौमिका महाडिक करत आहेत. या गोष्टी त्यांनी थांबवाव्यात. संघामध्ये संचालक असणार्या शौमिका महाडिक यांनी वस्तुस्थिती माहित असतानादेखील गोकुळची बदनामी करणे दुर्दैवी असल्याचे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे  म्हटले आहे.

          शौमिका महाडिक यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि नेमकी वस्तुस्थिती खालील प्रमाणे आहे. असे म्हणत

1) गायत्री कोल्ड स्टोरेजचा पॅकींगचा ठेका रद्द करुन किकवी येथील अनंत  डेअरी यांना पॅकींगचा ठेका देण्याच्या निर्णयाची वस्तुस्थिती 

2. गोकुळ दूध संघामध्ये सत्तांतर झाल्यानंतर या दोन ते अडीच वर्षात प्राथमिक दूध संस्था कडून पशुखाद्य मागणीत 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

3. मुंबई येथील दूध विक्री घटलेली नसून वाढलेली आहे.

          मुंबई येथील दूध विक्री कमी झाली असे संचालिका महाडिक म्हणतात. पण मुंबईतील मागील दोन वर्षाच्या गोकुळ दूध विक्रीचा आढावा घेतला तर गत वर्षीच्या तुलनेत मुंबईच्या विक्रीमध्ये वार्षिक 69 लाख लिटर्स दूधाची वाढ झालेली दिसते. याचाच अर्थ प्रत्येक दिवशी 18 हजार ९३५ लिटर इतकी दूध विक्री वाढ झालेली आहे.

सन २०२१-२२ दूध विक्री : २८ कोटी १६ लाख लिटर

सन २०२२-२३ दूध विक्री : २८ कोटी ८५ लाख लिटर

4. नवीन दूध संस्थांना परवानगी सहाय्यक निबंधक (दुग्ध) या कार्यालयाकडून दिली जाते.

          गेल्या दोन वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गोकुळ दूध संघाशी संलग्न दूध संस्था काढल्या आहेत. या संस्था काढत असताना सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन सहाय्यक निबंधक (दुग्ध) यांच्या कडे प्रस्ताव सादर केल्यानंतर सर्व कागदपत्रांची छाननी करुनच त्यांच्या कार्यालयाकडून नवीन दूध संस्थांना मंजूरी दिली जाते. यानंतर गोकुळ दूध संघ अशा संस्थांना दूध संकलनासाठी परवानगी देतो. त्यामुळे सर्व नियम पायदळी तुडवून नवीन संस्था काढल्या असे शौमिका महाडिक यांनी म्हणणे म्हणजे त्यांचे या संपूर्ण प्रक्रीयेबद्दल अज्ञान असल्याचे दिसून येते. 

कामकाजात सुधारणा नसल्यानेच महाडीकांचे जावयाचा ठेका रद्द

महत्वाची बाब म्हणजे महाडीकांचे जावयांच्या प्लांट बाबत शासनाकडे आणि संघाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत संघाने या प्लांट ला वारंवार लेखी तसेच तोंडी सूचना देऊन योग्य त्या सुधारणा करणेबाबत सूचित केले होते तसेच हरित लवादामध्ये सदर प्लांट विरुद्ध याचिका हि  दाखल झाली होती. अनेक संधी देऊनसुद्धा महाडिक यांच्या जावयाच्या प्लांट मध्ये सुधारणा झाली नाही त्यामुळेच संघ आणि लाखो शेतकऱ्यांच्या हितास्तव त्यांचा ठेका रद्द करणेचा निर्णय घेण्यात आला.

उच्च न्यायालयाने गोकुळ विरोधात कोणताही निर्णय दिलेला नाही

महाडीकांचे जावयांच्या याचिकेबाबत  उच्च न्यायालयाने गोकुळ विरोधात कोणताही निर्णय दिलेला नाही सध्या दिलेला आदेश हा उच्च न्यायालयाने दिलेला नसून तो अरबिट्रेटर ने दिला असून कायद्याची पायमल्ली करून संघाचे कोणतेही म्हणणे न ऐकता पारीत केलेला आहे व संघाने त्यावर सुप्रीम कोर्टात दाद न मागता जिल्हा न्यायालय कोल्हापुर येथे अपील दाखल केले आहे व लवकरच अरबिट्रेटर ने दिलेला आदेश एकतर्फी आहे हे स्पष्ट होईल. पत्राकाराना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणेचा प्रयत्न चालू आहे.

गोकुळ मधील सत्तांतरानंतर संघाच्या कामकाजातील ठळक बाबी 

·      वार्षिक उलाढाल २५५० कोटी वरून ३४२० कोटी रुपये इतकी झाली

·      सात वेळा दूध खरेदी दरात वाढ करण्यात आली. यामध्ये म्हैस दुधासाठी १० रुपये व गाय दुधासाठी ११ रुपये दरवाढ करण्यात आली.

·      म्हैस व गाय दूध दर फरकापोटी १०२ कोटी ८३ लाख रुपये इतकी रक्कम प्राथमिक दूध संस्थाच्या खात्यावर अदा .  फरकापोटी दूध उत्पादकांना गतसालच्या तुलनेत  १९ कोटी रुपये इतकी जादा दिली आहे.

·      फ्लश सीजन मध्ये १७ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण.

·      म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम सक्षमपणे राबिवण्यात येत आहे.

·      जातिवंत म्हैस खरेदी अनुदानामध्ये ५००० इतकी वाढ करण्यात आली.

·      मुंबई वाशी शाखा येथील दुग्धशाळेचे विस्तारीकरण करण्यात आले.

·      नवीन  पेट्रोल पंपास मान्यता

·      सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी मेडिकल ग्रेड ऑक्सीजन प्‍लॅन्ट सुरू केला.

·      भारतीय नौदल सेना (नेव्ही) कारवार यांना सिलेक्‍ट (यु.एच.टी) टेट्रापॅक दुधाचा पुरवठा

·      गोकुळ बासुंदी, सुगंधीत दूध(फ्लेवर मिल्‍क)  हे स्‍ट्रॉबेरी, पिस्‍ता, व्‍हेनीला व चॉकलेट या चार प्रकारांमध्‍ये उत्पादित केलेले आहे,  

·      सामान्य तापमानात १८० दिवस टिकून राहणारे नवीन टेट्रापॅक मधील मँगो,व्‍हेनिला लस्सी व मसाला ताक ग्राहकांच्या सेवेत दाखल केले आहे.

·      जनावराचे ताणतणाव कमी करणेसाठी व दुधाची गुणप्रत वाढविण्यासाठी स्ट्रेसनील  खाद्य पुरकाची  निर्मीती केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…