Home Uncategorized वारूळ हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.ए.पाटील यांचा सत्कार

वारूळ हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.ए.पाटील यांचा सत्कार

3 second read
0
0
75

व्यवस्थापनासह उपक्रमशिल नेतृत्व श्री एस.ए.पाटील यांच्या रूपाने लाभले. वारूळसारख्या डोंगराळ भागात बापूजींच्या कार्याचा सेवाभावी वारसा त्यांनी जपल्याचे गौरवउद्गागार संस्थेचे अध्यक्ष अभयसिंह सांळोखे यांनी काढले.येथील हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.ए.पाटील यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात ते बोलत होते.स्वागत एस.एस.कोळी सर यांनी केले. संस्थेच्या व पालकांच्या वतीने पाटील यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरवले.

यावेळी येथील पालकांनी येथे कला व वाणिज्य शाखा सुरू करण्याबाबतचे निवेदन संस्था प्रमुख साळूखे यांना दिले. येत्या शैक्षणिक वर्षात ११ वी व १२ वी वर्ग सुरू होतील अशी ग्वाही त्यांनी दिली.यावेळी गटशिक्षणाधिकारी जयश्री जाधव, श्रीराम साळुंखे, केंद्रसमन्वयक राजेंद्र लाड, यांनी मनोगते मांडली. सत्कार मुर्ती पाटील सर यांचे भाषण झाले. प्रकाश पाटील, केंद्रप्रमुख बी.बी.कोंडावळे, उपसरपंच गोविंद सुतार प्रमुख उपस्थित होते. आभार संतोष कुंभार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…