Home Uncategorized शैक्षणिक व सांस्कृतिक विकासाचे केंद्र म्हणजे ब्रिलीयंट स्कूल ; आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे प्रतिपादन

शैक्षणिक व सांस्कृतिक विकासाचे केंद्र म्हणजे ब्रिलीयंट स्कूल ; आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे प्रतिपादन

3 second read
0
0
62

शिरोळ : प्रतिनिधी
रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलीयंट इंग्लिश मिडीयम स्कूल शिरोळ या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व परितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना दिले जाणारे दर्जेदार शिक्षण व जोपासणारी संस्कृती यांचे कौतुक केले. अध्यक्ष मा. मोहन माने सर यांची या क्षेत्रातील दूरदृष्टीने व आधुनिक पद्धतीचे दिले जाणारे शिक्षण हा विद्यार्थांचा सर्वागीण विकास घडवणारे असल्याचे मत व्यक्त केले. व विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या सादर कालागुणांचे कौतुक केले. यावेळी संस्थेच्या वतीने महाराष्ट्र विधानसभेचे शिरोळ तालुक्याचे आमदार झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष. मा. मोहन माने सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष मा. मोहन माने सर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यांनी शाळेच्या गेली १९ वर्ष यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. विविध कौशल्यावर आधारित मल्टीस्कीलच्या माध्यमातून दिले जाणारे शिक्षण तसेच एन.सी.आर.टी च्या अभ्यासक्रमावर आधारित दिले जाणारे शिक्षण यातून विद्यार्थांचा होणारा बौद्धिक विकास व त्यांना दिले जाणारे प्रोत्साहन या बाबत आपले मत व्यक्त केले. या शाळेतील विद्यार्थांना आंतरराष्ट्रीय दर्जेचे उत्कृष्ट शिक्षण देणेचे काम हि शाळा करत असून विद्यार्थांच्या विविध कलागुणांना वाव देणेसाठी हि शाळा नेहमीच प्रयत्नशील राहील असे. पालकांशी संवाद करताना मत व्यक्त केले.

संस्थेच्या संचालिका सौ. स्वाती माने यांनी शाळेतील विविध उपक्रमशील गोष्टीचा आढावा घेतला त्या म्हणाल्या कि विद्यार्थांचा सर्वागीण विकास हाच आमच्या शाळेचा ध्यास आहे. आजच्या विद्यार्थांची त्याच्यातील क्षमता ओळखून त्यांना विविध कौशल्यावर आधारित शिक्षण दिले. जाते लीडच्या माध्यमातून सर्व क्लासेस स्मार्ट क्लास करण्यात आले आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑडीओ व्हीडीओ. माध्यमातून शिक्षण देण्यात येते. विषयानुसार अॅक्टीविक्टी घेतल्या जातात. शाळेतील सर्व शिक्षक उच्च शिक्षित व अनुभूवी असून विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असतात. व शाळेचे सर्व पालक स्कूल च्या विविध उपक्रमास सहकार्य करतात. याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी गटशिक्षणाधिकारी सौ भारती कोळी यांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले व ज्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

विठ्ठल मोरे यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या व सांस्कृतिक कार्याक्रमाचे तोंड भरून कौतुक केले व शाळा राबवीत असलेल्या सर्व उपक्रम व विद्यार्थांच्या अंतर्गत गुणांन दिले जात असलेल्या प्रोत्साहन याबद्दल शाळेचे कौतुक केले.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष अमरसिह पाटील व त्यांच्या पत्नी सौ. इंद्रायणी पाटील उपस्थित होत्या. ब्रिलीयंट स्कूलच्या संचालिका ऑ. कु. तृप्ती माने व डॉ. पूजा माने यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीचे शिक्षण मिळावे या दूरदृष्टीने पालकांसमोर पुढील दहा वर्षाचे व्हीजन मांडले. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची संस्कृतीचे विविध कार्यक्रमातून दर्शन घडवले. शैक्षणिक व क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे संस्थेचे वार्षिक दिनदर्शिकचे २०२५ – २०२६ च मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी डॉ. धैर्यशिल माने संचालक वासंती माने नार्सिंग कॉलेज कराड मा. संजय माने संचालक आर.एम.सी.टी मा, शांतादेवी माने (काकू) संचालिका आर.एम.सी.टी, मा. गणपतराव पाटील मा. सरपंच आरग, श्री. सतीश ढवळे पी.टी.ए अध्यक्ष, सौ. अंजना माने संचालिका आर.एम.सी.टी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य श्री.पी.एस. काकडे सर वार्षिक अहवालाचे वाचन केले. व कार्याक्रमचे सूत्र संचालन श्री. पियुष काकडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

चिपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपिका परीट यांची बिनविरोध निवड

शिरोळ : प्रतिनिधी चिपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपिका नितीन परीट यांची बिनविरोध निवड कर…