Home Uncategorized प्राचार्य डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

प्राचार्य डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

4 second read
0
0
106

मलकापूर-पेरीड येथील रयत शिक्षण संस्थेचे प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा व आय. बी. पी. एस .परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने ” स्पर्धा परीक्षेचे स्वरूप व तयारी ” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख वक्ते: मा. श्री. प्रविण गोसावी, मा. श्रीमती. अश्विनी पाटील आणि मा. श्री. सुमित कोळी (फोकस फाऊंडेशन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, बांबवडे) यांनी एम. पी. एस. सी. व यु. पी. एस. सी चे बदलते स्वरूप व तयारी या विषयावर मार्गदर्शन केले.

सदर वेळी सुमित कोळी आपल्या भाषणात म्हणाले की भरपूर अभ्यास योग्य मार्गदर्शन व संयम यांच्या जीवावरच स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त झाल्यानंतर प्रतिष्ठा तर मिळतेच परंतु समाज सेवा करण्याची नामी संधी मिळते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य, डाॅ. टी. एन. घोलप हे होते. केंद्राचे समन्वयक डाॅ. सत्यवान बनसोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डाॅ. ए. एस. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. समाधान जाधव यांनी आभार मानले. या प्रसंगी प्रा. आर. एस. सुतार, प्रा. श्रीमती. आर. आर. बोडेकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…