शाहूवाडी दि. १०/०३/२०२३ रोजी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग व नेचर क्लबतर्फे रंगपंचमीचे औचित्य साधून पर्यावरणपूरक रंग या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली.
या कार्यशाळेचे उद्घाटन प्रमुख मार्गदर्शक श्री अनिल चौगुले, कार्यशाळेचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एन. घोलप यांच्या हस्ते ओव्याच्या रोपाला पाणी घालून करण्यात आले.
या कार्यशाळेची रूपरेखा भूमिका वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख व नेचर क्लबचे चेअरमन डॉ. मकरंद ऐतवडे यांनी सांगितली.
श्री अनिल चौगुले यांनी नैसर्गिक रंगाचे महत्त्व आणि ती बनविण्याची प्रात्यक्षिके दाखवली.
यानंतर उपप्राचार्य डॉ. एन. एस. आडनाईक यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. शेवटी कार्यक्रमाचे आभार सायंस विभाग प्रमुख डॉ. एन. के. कांबळे सर यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी आपली मनोगते व्यक्त केली.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी तसेच शिक्षकेतर सेवकांचे सहकार्य लाभले.l



