Home Uncategorized मलकापूर येथील कोरे महिला महाविद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन व अ.नि.स. वर्धापन दिन संपन्न

मलकापूर येथील कोरे महिला महाविद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन व अ.नि.स. वर्धापन दिन संपन्न

3 second read
0
0
163

मलकापूर प्रतिनिधी:

श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ वारणानगर संचलित श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालय येलूर मलकापूर ता. शाहूवाडी, या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभाग यांचे वतीने ऑगस्ट क्रांती दिन व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा वर्धापन दिन या दिवसांचे निमित्त साधून अंधश्रद्धा जनजागृती पर व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन मा.आमदार डॉ. विनयरावजी कोरे (सावकर) व श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.डॉ.विलास कार्जीनी सर यांच्या प्रेरणेतून साकार झाले.

सदर कार्यक्रम माननीय महाविद्यालयाचे समन्वयक श्री.भालचंद्र शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय प्र. प्राचार्य प्रा.डॉ.व्ही.एस.पाटील यांच्या संयोजनाखाली पार पडला व कार्यक्रमाचे नेटके असे नियोजन महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रशांत कांबळे यांनी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, कार्यालयीन कर्मचारी , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थीनी यांच्या सहकार्याने केले होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री.कृष्णात स्वाती, राज्य सरचिटणीस, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र राज्य व प्रा.शिवाप्पा पाटील क्रियाशील सदस्य,अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाहुवाडी तालुका हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. आर.एस.पाटील सरांनी केली. प्रमुख पाहुण्यांचे पुष्प देऊन स्वागत महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.व्ही. एस.पाटील सर यांनी केले. प्रा.शिवाप्पा पाटील सरांनी संवादाचे महत्व एका उदाहरणाच्या सहाय्याने अतिशय उत्कृष्टपणे व्यक्त केलं. प्रमुख वक्ते व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती सरांनी विद्यार्थिनींना बोलकं केलं विद्यार्थिनींच्या मनामध्ये असणाऱ्या विविध अंधश्रद्धे विषयी योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या मनातील शंका दूर करण्याचे बहुमूल्य कार्य केले. नरबळी च्या घटनेचा संदर्भ अतिशय मार्मिक भाषेत देण्याचा प्रयत्न केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.व्ही. एस.पाटील यांनी भौतिकशास्त्रातील उदाहरणांचा संदर्भ देत स्वामी विवेकानंदांच्या प्रयत्नवादी विचार कसा पुढे नेता येईल याविषयी मार्गदर्शन केले. नरेंद्र दाभोलकर करांच्या काही आठवणी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे आभार पुष्प मराठी विभागप्रमुख प्रा.आर.एम.म्हावळे यांनी व कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.प्रशांत कांबळे यांनी केले व कार्यक्रम पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते, महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी सदर कार्यक्रमास उपस्थित होत्या. कार्यक्रम अतिशय उत्तम नियोजनात पार पडला‌.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…