Home Uncategorized प्रा. डॉ.एन.डी. पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

प्रा. डॉ.एन.डी. पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

4 second read
0
0
270

मलकापूर प्रतिनिधी

प्रा. डॉ.एन.डी. पाटील महाविद्यालय, पेरीड-मलकापूर येथे मा. प्राचार्य डॉ. टी.एन. घोलप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शाहूवाडी यांचे कार्यालय आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १४ व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक २३/०१/२०२४ रोजी घोष वाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. घोष वाक्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, श्री गणेश प्रकाश पाटील तर द्वितीय क्रमांक कु. धनश्री धनंजय पोवार तर तृतीय क्रमांक कु. मयुरी बळवंत कांबळे यांनी यश संपादन केले.

दिनांक २४/०१/२०२४ रोजी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. दिक्षा तानाजी शेणवी तर द्वितीय क्रमांक कु. सोनाली विलास गुरव तर तृतीय क्रमांक कु. दर्शना लक्ष्मण यादव यांनी यश संपादन केले. दिनांक २४/०१/२०२४ रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. हर्षदा पांडुरंग पाटील तर द्वितीय क्रमांक प्रमोद लक्ष्मण साळोखे तर तृतीय क्रमांक अनुराधा रमेश सुतार यांनी यश संपादन केले तसेच दिनांक २५/०१/२०२४ रोजी तहसिल कार्यालय शाहुवाडी यांच्यावतीने मतदार जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते प्रा.डॉ.एन.डी. पाटील महाविद्यालयामधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विध्यार्थ्यांनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला.

प्रा.डॉ.एन.डी. पाटील महाविद्यालय ते ग्रामपंचायत कार्यालय पेरीड अशी मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली. तसेच दिनांक २५/०१/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता प्रा.डॉ. एन.डी. पाटील महाविद्यालय, पेरीड-मलकापूर येथे राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. विशाल फडतरे यांनी राष्ट्रीय मतदार दिन निम्मित माहिती देवून सामूहिक मतदारासाठीची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना दिली . याप्रसंगी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. टी. एन. घोलप साहेब तसेच महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. नामदेव आडनाईक तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर वर्ग आणि महाविद्यालयातील बहुसंख्य विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…