Home Uncategorized पन्हाळा कुमार विद्यामंदिरमध्ये शालेय व्यवस्थापन समितीची निवड; भाजप तालुकाध्यक्षांकडून शाळेला संगणक भेट

पन्हाळा कुमार विद्यामंदिरमध्ये शालेय व्यवस्थापन समितीची निवड; भाजप तालुकाध्यक्षांकडून शाळेला संगणक भेट

2 second read
0
0
20

पन्हाळगडावरील 99 वर्षे पूर्ण केलेली जिल्हा परिषदेची सर्वात जुनी शाळा कुमार विद्यामंदिर पन्हाळा येथे आज शालेय व्यवस्थापन समितीची लोकशाही पद्धतीने निवड करण्यात आली. याच कार्यक्रमात भाजप तालुका अध्यक्ष अमरसिंह भोसले यांच्याकडून शाळेला संगणक भेट देण्यात आला.
मुख्याध्यापिका रमना चिले यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी 3 वाजता सर्व पालकांची बैठक बोलावण्यात आली होती. हात वर करून झालेल्या निवड प्रक्रियेत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शहाबाज शब्बीर मुजावर यांची सर्वानुमते निवड झाली. उपाध्यक्षपदी अपर्णा मदन काशीद यांची निवड करण्यात आली. सचिवपद मुख्याध्यापकांकडे राहणार असून शिक्षक प्रतिनिधी म्हणून सरदार गायकवाड यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरदार गायकवाड यांनी केले, तर आभार मुख्याध्यापिका रमना चिले यांनी मानले.
संगणक भेट आणि शाळेच्या विकासाचे आश्वासन
शिष्य संवर्धिनी प्रतिष्ठान आणि महापारेषण यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील चार प्रमुख शाळांना संगणक भेट देण्याचा उपक्रम राबवण्यात आला. त्यामध्ये कुमार विद्यामंदिर पन्हाळा शाळेचा समावेश आहे.
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष अमरसिंह भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, “ही माझी शाळा आहे. त्यामुळे लागेल ती मदत मी शाळेला करणार. हे माझे कर्तव्य आहे.”
इमारत शंभर वर्षांपूर्वीची असल्याचे सांगून त्यांनी पुढे सांगितले की, नवीन शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसोबत घेऊन शाळेच्या इमारतीसाठी शासन दरबारी पाठपुरावा केला जाईल. शाळेसाठी निधी कसा मिळवता येईल आणि काम पूर्ण करून घेता येईल यासाठी प्रयत्न करू. ही शाळा कायमस्वरूपी टिकावी आणि महाराष्ट्रातील सर्वात सुंदर शाळा बनवण्याचा आमचा मानस आहे.
या कार्यक्रमाला माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनिता उदाळे, पत्रकार अनुप गवंडी, नगरसेविका रशिदा मुजावर, प्रियांका गळवी, तसेच पालक, शरीफ नगारजी, विश्वजीत पाटील आदी उपस्थित होते

पन्हाळा प्रतिनिधी – सचिन वरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पशुधन आरोग्य व दुग्ध व्यवसाय वृद्धीसाठी गोकुळ-सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाची संयुक्त बैठक संपन्न..

कोल्हापूर, ता. ०६ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) व सिद्धगिरी पशु…