Home Uncategorized आजरा तहसिल कार्यालयात 21 जुलैला लोकशाही दिनाचे आयोजन

आजरा तहसिल कार्यालयात 21 जुलैला लोकशाही दिनाचे आयोजन

4 second read
0
0
60

कोल्हापूर, दि. 17: प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर लोकशाही दिन साजरा करण्यात येतो. सोमवार, दिनांक 21 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय आजरा येथे तहसिलदार लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. आजरा तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या शासकीय, निमशासकीय विषयांकीत कामांच्या प्रशासकीय स्तरावरील वैयक्तिक तक्रारीबाबत न्याय मिळण्यासाठी स्वत: उपस्थित राहून अर्ज सादर करावा, असे आवाहन आजरा तहसिलदार समीर माने यांनी केले आहे.अर्ज स्वीकृतीचे निकष पुढीलप्रमाणे-अर्ज विहीत नमुन्यात असावा. (नमुना प्रपत्र 1 अ ते 1 ड), तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. चारही स्तरावरील लोकशाही दिनाकरिता अर्जदाराने आपला अर्ज विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतीत सादर करावेत. तालुका लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी, महानगरपालिका, आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी विभागीय आयुक्त लोकशाही दिनांत व विभागीय आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी मंत्रालय लोकशाही दिनांत अर्ज करता येईल. या लोकशाही दिनांक न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व, अपिल, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे, देण्यात येणार आहे, अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषया संदर्भात केलेले अर्ज, तक्रार, निवदेन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जात नाहीत.लोकशाही दिनाच्या 15 दिवस अगोदर विहीत नमुन्यात तहसिल कार्यालय, आजरा. ता. आजरा येथे आपला अर्ज देण्यात यावा.0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…