Home Uncategorized समाजकल्याण विभागाच्या शिरोळ येथील शासकीय निवासी शाळेची सलग १०० टक्के निकालाची परंपरा कायम…

समाजकल्याण विभागाच्या शिरोळ येथील शासकीय निवासी शाळेची सलग १०० टक्के निकालाची परंपरा कायम…

2 second read
0
0
71

शिरोळ : कुणाल कांबळे

   शिरोळ येथील समाजकल्याण विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेचा इयत्ता १० वीचा  निकाल १०० टक्के इतका लागला आहे. विद्यार्थ्यांनी सलग १० च्या १०० टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे. यामध्ये प्रथम क्रमांक राजवीर युवराज कांबळे (७८ टक्के), द्वितीय क्रमांक अथर्व राजेंद्र कांबळे ( ७५.२० टक्के) आणि तृतीय क्रमांक सुदर्शन दत्ता कांबळे ( ७०.८० टक्के) गुण मिळवले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, शानिशा विशेष अधिकारी अक्षय कुरणे, मुख्याध्यापक प्रदीप जवाहिरे, प्रभारी गृहपाल बाळू खोडके यांचे मार्गदर्शन लाभले. समाजकल्याण विभागाच्या सर्व सोयीनियुक्त कार्यरत असणाऱ्या आगरभाग, शिरोळ येथील शासकीय निवासी शाळेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, विशेष अधिकारी अक्षय कुरणे, मुख्याध्यापक प्रदीप जवाहिरे,प्रभारी गृहपाल बाळू खोडके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…