Home Uncategorized माले येथे जिल्हास्तरीय शालेय आट्यापाट्या स्पर्धा संपन्न…!

माले येथे जिल्हास्तरीय शालेय आट्यापाट्या स्पर्धा संपन्न…!

18 second read
0
0
133
Oplus_16908288

माले ( प्रतिनिधी: सनी काळे) :- पन्हाळा तालुक्यातील माले येथील ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल या प्रशालेमध्ये क्रीडा आणि युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर आणि ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल यांच्या वतीने 14 ,17 आणि 19 वर्षाखालील मुला-मुलींच्या वयोगटातील जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्ह्यातून 73 संघाने स्पर्धेत सहभाग घेतला.या स्पर्धेत 14 वर्षे खालील मुलामध्ये प्रथम क्रमांक -ज्योतिर्लिंग विद्यानिकेतन माले,द्वितीय क्रमांक- शिवतेज बाल विकास प्राथमिक विद्यामंदिर कसबा आळते,तृतीय क्रमांक- मॉडर्न विद्यानिकेतन आळते तर मुलीमध्ये प्रथम क्रमांक -न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ,द्वितीय क्रमांक- आबासाहेब
भोगावकर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज बाजारभाव,तृतीय क्रमांक- छत्रपती शिवाजी हायस्कूल सैनिक टाकळी,17 वर्षाखालील मुलामध्ये प्रथम क्रमांक- छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन पेठ वडगाव,द्वितीय क्रमांक- आनंदीबाई बळवंतराव सरनोबत हायस्कूल आसुर्ले पोर्ले,तृतीय क्रमांक- मॉडर्न विद्यानिकेतन आळते, मुलीमध्ये प्रथम क्रमांक -आनंदीबाई बळवंतराव सरनोबत हायस्कूल आसुर्ले पोर्ले,द्वितीय क्रमांक- यशवंतराव पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सोळांकुर,तृतीय क्रमांक- इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज पेठ वडगाव, 19 वर्षाखालील मुलामध्ये प्रथम क्रमांक-श्री प्रशाला हायस्कूल पाटेगाव,द्वितीय क्रमांक- वारणा विद्यालय व आबासाहेब जुनिअर कॉलेज नवे पारगाव, तृतीय क्रमांक- आदर्श विद्यानिकेतन अँड जुनिअर कॉलेज मिंणचे, तर मुलीमध्ये प्रथम क्रमांक- आबासाहेब भोगावकर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज बाजारभाव,द्वितीय क्रमांक- छत्रपती शिवाजी हायस्कूल सैनिक टाकळी, तृतीय क्रमांक- बळवंतराव यादव हायस्कूल व जुनिअर कॉलेज पेठ वडगाव या शाळांनी अनुक्रमे क्रमांक पटकवले,या स्पर्धेमध्ये पंच म्हणून कुणाला नाईक, डि.के कांबळे, संजय जाधव, राहुल देवकुळे, योगेश जाधव ,प्रणव पाटील ,बाळासो पाटील, शुभम ,यश कारंडे,आदर्श कदम आदींनी काम पाहिले.यावेळी कोल्हापूर जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनचे अध्यक्ष संजय जाधव, संस्थेचे अध्यक्ष शिवलिंग कळंत्रे,शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कळंत्रे, सतीश रणभिसे यासह खेळाडू उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…