Home Uncategorized तेरवाड येथे पीएसआय महेश साळुंखे यांचा आर्यन्स मंडळ तर्फे भव्य सत्कार संपन्न

तेरवाड येथे पीएसआय महेश साळुंखे यांचा आर्यन्स मंडळ तर्फे भव्य सत्कार संपन्न

4 second read
0
0
89

शिरोळ : कुणाल कांबळे
नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल हाती आला. यातून शिरोळ तालुक्यातील तेरवाड या छोट्याशा गावचा रहिवासी असणाऱ्या एक गरीब कुटुंबमधील महेश साळुंखे याने घवघवीत यश मिळवले आहे. महेशचे वडील एक छोट्या टपरीमध्ये केस दाढी करण्याचे काम करतात तरं आई कधी रोपवाटिका तर कधी छोट्याशा कंपनी मध्ये जाउन आपला मुलाचे शिक्षण व आपला उदरनिर्वाह करतात. अशा परिवारमधून आलेल्या यां तरुणाची पीएसआय म्हणुन निवड झाली. महेश चे प्राथमिक शिक्षण हे तेरावाड गावच्या प्राथमिक आश्रम शाळा मध्ये झाले .तो सुरवातीपासून हुशार मेहनती. प्रेमळ. संयमी व दूरदृष्टी ठेवून वाटचाल करणार विध्यर्थी. याची पीएसआयपदी निवड झाली समजताच कुटुंब, मित्र परिवार, नातेवाईक यांचामध्ये आनंदचा उत्साह मावेना असा झाला. आमचा महेश्या फौजदार झाला असा एकच जल्लोष दरवळून उठला… व वातावरण जल्लोषि सुगंधीत झाले..आणि गावामधून भव्य दिव्य अशी रुबाबदार उत्साही मोठ्या थाटामाटात .भव्य आतिषबाजीत.. आवाज चा दणदाणा मध्ये नाचत गाजत मिरवणूक काढून तेरावाड मधील आर्यन्स मंडळ च्या वतीने व कॅम्पस बॉईज यांच्या सहकाऱ्यांना तेरवाड मधील गंगापूर आर्यन्स चौक यां ठिकाणी भव्य दिव्य नागरी सत्कार करण्यात आला…

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तेरवाड गावचे सुपुत्र व सध्या तहसीलदार म्हणून यां पदावर कार्यरत असणारे मा.दिलीप रायन्नवर सर उपस्थित होते. तेरवाड गावांमधील गेल्या वर्षभरामध्ये 25 एक विद्यार्थी हे प्रशासकीय सेवेत रुजू झाले तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी केली या सर्वांचा व त्यांच्या पालकांचा नागरी सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्यासाठीRPi तालुका अध्यक्ष संजय शिंदे. मा विशाल कांबळे महाराष्ट्र पोलीस तसेच एकाच वेळी तीन पोस्ट करणारे धीरज ढाले सर हे प्रमुख मार्गदर्शक हे उपस्थित होते
तसेच तेरवाड गावच्या नतुन जिल्हा परिषद सदस्या सौ. श्रद्धा अविनाश गायकवाड वहिनी यांचा देखील नागरी सत्कार आर्यन्स मंडळाच्या वतीने करण्यात आला.

यावेळी निवेदक म्हणुन सुप्रसिद्ध शाहीर रणजित कांबळे हे होते यांनी आपल्य़ा गोड मधुर वाणी मधून श्रोताचे मन मोहक करून सोडले. प्रमुख पाहुणे तसेच मान्यवरांचे मनोगत व्यक्त करण्यात आली प्रमुख पाहुणे दिलीप रायन्नवर सर हे बोलत असताना म्हणाले शिरोळ तालुक्यात सैनिक टाकळी हे जसे सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. तसेच महाराष्ट्र मध्ये शिरोळ तालुक्यातील तेरवाड हे गाव अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जावे यासाठी मी कायम कटिबद्ध आहे. तसेच बोलताना ते पुढे म्हणाले गावातील तरुणांची उल्लेखनीय कामगिरी पाहून गावातील सर्व गटातटाच्या राजकारणी पुढाऱ्यांनी गावच्या युवा पिढीसाठी कसलेही राजकारण आणू नये अशी एक मापक इच्छा व्यक्त केली. तसेच आपण जर प्रामाणिक प्रयत्न ठेवला तर आपले यश कितीही दूर लांब असले तरी आपण आपल्या मेहनत कष्ट अभ्यास व जिद्दीच्या जोरावर मिळवू शकतो हे सांगितले त्याचबरोबर गावातील पालकांना त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणावर गुंतवणूक करावे पुढे जाऊन त्याचे गुणात्मक फायदे होतील असाही संदेश त्यांनी आपल्या भाषणामध्ये गावकऱ्यांना दिला .

त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य सौ श्रद्धा गायकवाड वहिनी हे आपले मनोगत व्यक्त करत असताना त्यांनी गावामध्ये भव्य अशी अभ्यासिका उभारण्यासाठी प्रयत्नशील असेल ग्वाही दिली असे अनेक मान्यवरांचे व्यक्त करण्यात आली यामध्ये प्राध्यापक धनाजी कांबळे विलास कांबळे सर विपुल कांबळे उमेश आवळे अरुण भंडारे हर्षवर्धन भोयेकर पोर्णिमा गोंधळी प्रभाकर बंडगर यांनी मनोगत व्यक्त केली

सत्कारमूर्ती महेश साळुंखे यांनी आपली यशाची घोडदौड सांगत असताना ते म्हणाले आपल्या आई-वडिलांच्या पाटीला पोट चिकटूपर्यंत कष्ट करणाऱ्या जाणीव आपण जर डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणे अभ्यास केला एखाद्या वेळेस अपयश आले तरी खचून न जाता शांत व संयमी मार्गाने सातत्यपूर्ण आपण ठेवलेल्या टारगेटच्या दिशेने चालत राहिलं तर निश्चित पणाने यश हे आपल्या पदरात पडल्याशिवाय राहत नाही असा संदेश इथल्या तरुण वर्गाला त्यांनी दिला.

या नागरी सत्कार समारंभाचे सांगता आभार विशाल कांबळे यांनी केले या सत्कार समारंभासाठी तेरवाड गावातील बहुसंख्य लोक तरुण तरुणी उपस्थित होते या नागरी सत्कारा मधून एक प्रेरणा मिळावी भविष्यामध्ये असेच सत्कार समारंभ अधिकारी घडावे हा प्रामाणिक विचार मनामध्ये ठेवून संग्राम जगताप संजय माने स्वप्निल माळी सोहेल पटेल अतुल कोळी रोहित माने सुमित खराडे या तरुणांनी अतिशय मेहनत घेऊन हा सत्कार समारंभ पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…