Home Uncategorized शिवसेनेतर्फे दुर्ग पन्हाळ्यावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

शिवसेनेतर्फे दुर्ग पन्हाळ्यावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

2 second read
0
0
109

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि मोघलमर्दिनी महाराणी ताराराणी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या ऐतिहासिक दुर्ग पन्हाळा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सोहळ्याची सुरुवात गडपूजनाने झाली. त्यानंतर नगारखाना येथे भगवा ध्वज फडकावून शिवराज्याभिषेक दिनाला अभिवादन करण्यात आले. पुढे नरवीर बाजीप्रभू देशपांडे व वीर शिवा काशीद यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. शिवमंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करून शिवमंदिर ते महालक्ष्मी मंदिरपर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीत शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. लहान मुलांनी सादर केलेल्या मर्दानी खेळांच्या आकर्षक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली व सोहळ्याला विशेष रंगत आणली.

यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख नामदेव गिरी, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, पन्हाळा तालुकाप्रमुख बाबासाहेब पाटील, शहरप्रमुख मंजित माने, विशाल देवकुळे, युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्नील मगदूम, महिला आघाडीच्या स्मिता सावंत, सागर साळोखे, दिनेश साळोखे, रवी निंबाळकर, विराज पाटील, संतोष व्हरांबळे, वैभव कोळी, स्वप्नील जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पन्हाळा : प्रतिनिधी / सचिन वरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्य…