शिरोळ : प्रतिनिधी
शिरोळ विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांनी आज तमदलगे, निमशिरगाव, संभाजीपूर या भागात जन आशीर्वाद दौरा केला. मतदारांनी गणपतराव पाटील यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. या दौऱ्यामध्ये मतदारांनी गणपतराव पाटील यांच्या निष्ठावंत, अभ्यासू आणि संयमी नेतृत्वाला निवडून देण्याची ग्वाही दिली..तमदलगे येथे झालेल्या सभेत पृथ्वीराजसिंह यादव म्हणाले, गणपतराव पाटील यांनी राजकीय जीवनात कोणतीही निवडणूक लढवली नसली तरी कारखाना आणि श्री दत्त उद्योग समूहाच्या सर्व संस्था अतिशय चांगल्या रीतीने चालविल्या आहेत. स्वर्गीय सा. रे. पाटील साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून ते काम करीत आहेत. त्यांची उमेदवारी ही तरुण, कष्टकरी, महिला याचबरोबर सर्वसामान्यांची उमेदवारी आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात क्रांती आणण्यासाठी, त्यांच्यात बदल घडवून सक्षम करण्यासाठी ही उमेदवारी आहे. गायरान जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प, वॉटर एटीएम, शाळेचे प्रश्न, जॉब कार्ड काढून युवक रोजगार मेळावे, विद्यार्थी शिष्यवृत्ती, नोकरी, महिला सक्षमीकरण आदी गोष्टींवर गाव विकासाची दूरदृष्टी ठेवून स्वच्छ चारित्र्य आणि निष्कलंक नेतृत्वाला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिरोळ तालुका अध्यक्षा स्नेहलता देसाई म्हणाल्या, शेतकरी हिताच्या दृष्टीने काम करणारा माणूस विधानसभेत जाणे आवश्यक आहे. महायुती सरकारचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. त्यामुळे त्यांच्या भुलथापांना बळी न पडता महाविकास आघाडीला निवडून देणे गरजेचे आहे. शंकराव शिरसाठ म्हणाले, महायुतीने महाराष्ट्रासमोर अनेक संकटे निर्माण केली असून संविधानाची पायमल्ली करून सत्तेत आले आहे. आपल्याला मविआ शिवाय पर्याय नसून काँग्रेसच्या नेतृत्वावरच आपण विश्वास व्यक्त केला पाहिजे. गणपतराव पाटील म्हणाले, तमदलगेच्या डोंगरावरती काही वर्षांपूर्वी एक लाख रोपांची लावण आणि एक लाख बियाणांची टोकन केली होती. पण ते टिकले नाही. पर्यावरण पूरक काम केल्यास सर्वांगीण विकास होऊ शकतो. आपली उमेदवारी ही स्वतःसाठी न राहता तळागाळातील लोकांसाठी असून नवी दृष्टी देऊन काम करण्यावर मी भर देणार आहे. राजगोंडा पाटील यांनी आभार मानले.
माजी पंचायत समिती सभापती कविता चौगुले, राजेंद्र प्रधान, शुभम पाटील, वसंतराव देसाई, सुनील कांबळे, रावसाहेब रुग्गे, शुभम गुरव, अक्षय गुरव, राहुल पाटील, सौरभ भोसले, आदेश खाडे, जिनगोंडा पाटील, बाबासाहेब गायकवाड, मच्छिंद्र माळी, कल्लाप्पा परीट, सौरभ माने, अक्षय कांबळे, सुरगोंडा पाटील, अजय पुजारी, अभी पुजारी, संदीप कांबळे, विजय कांबळे, दीपक कांबळे, सुहास कांबळे, अजित कांबळे, आकाश कांबळे, अभी कांबळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
निमशिरगाव येथे महादेवराव धनवडे म्हणाले, देशात जातीयवादी शक्ती उफाळून आली असून शिरोळ तालुक्यातही याला खतपाणी घातले जात आहे. खोके संस्कृतीतून हे महायुती सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे काही दिवसात पैशाचा पाऊस पडेल, भूलथापा, आमिषे दाखविली जातील. भ्रष्टाचाराचे मीठ फुटलेल्या राजकारणाला दिशा देण्यासाठी गणपतराव पाटील यांना निवडून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल. स्वाती सासणे यांनी गणपतराव पाटील यांच्या रूपाने सर्वसामान्यांचा नेता आणि सर्वसामान्यांची सत्ता येणार असल्याचे सांगितले. माजी सरपंच बनाबाई कांबळे यांनी गणपतराव पाटील यांना निवडून आणण्याचे काम करणार असल्याचे सांगितले. गणपतराव पाटील यांनी स्व. दे. भ.रत्नाप्पाण्णा कुंभार, स्व. पी. बी. पाटील यांच्यासह इतर नेत्यांच्या विचारावर आपण सर्वसामान्य घटकांसाठी माणूस हाच धर्म मानून तालुक्याचा विकास करण्याची ग्वाही दिली.
विक्रम चौगुले, शितल पाटील, रवी सावंत, अमर कांबळे, वसंत पाटील, योगेश धनवडे, अतुल धनवडे, बनाबाई कांबळे, सुभाष चौगुले, पांडुरंग ठोमके, पिंटू कुरणे, श्रीकांत कांबळे, सुनील सावंत, रमेश धनवडे, रेखा पाटील, राजश्री मालवेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी गावातून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी महिलांनी गणपतराव पाटील यांचे औक्षण करून उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
संभाजीपूर येथे ग्रामदैवत श्री बिरदेव देवस्थान येथे श्रीफळ वाढविण्यात आला. पृथ्वीराजसिंह यादव, बी. जी. गुरव, महावीर देसाई, कविता चौगुले, सविता पाटील - कोथळीकर यांनी मनोगत व्यक्त करून गणपतराव पाटील यांना पाठिंबा दिला. संजय पाटील कोथळीकर, दिलीप पाटील कोथळीकर, रवी धोत्रे, भूषण मोगलाडे, अभिषेक भंडारे, सचिन हजारे, महादेव पाटील, योगेश शेटे, चेतन पाटील, विशाल पाटील, किरण पाटील, कन्हैया पाटील, वसंत पाटील, बी. एन. पाटील, समीर कनवाडे, राहुल मोरे, सर्जेराव बानेगोळ, राकेश पाटील, महादेव राजमाने, वसंत लडगे यांच्यासह महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.