Home Uncategorized कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

32 second read
0
0
11

शिरोळ : प्रतिनिधी

खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवून संवैधानिक आरक्षण व्यवस्थेचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात समस्त अनुसूचित जाती आरक्षण बचाव जनआंदोलन समितीच्या वतीने सोमवार दि. ९ मार्च रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य संघर्ष महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. या मोर्चाला शिरोळ तालुक्यातून सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिक जाणार असल्याची माहिती, आरपीआयचे तालुकाध्यक्ष संजय शिंदे यांनी दिली आहे.


गेली अनेक वर्षे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षण व्यवस्थेची पायमल्ली होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे पदे मिळविणाऱ्यांची जात प्रमाणपत्रे तत्काळ रद्द करावीत, संबंधितांची पदे बरखास्त करावीत व दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच शिरोळ तालुक्यात अशा प्रकारचे बोगस दाखले देण्यात येऊ नयेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या संघर्ष महामोर्चात शिरोळ तालुक्यातील बौद्ध, मातंग, चर्मकार, खाटिक, वाल्मीकी, बुरुड आदी समाजातील बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0;
algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:0;
brp_del_th:0.0000,0.0000;
brp_del_sen:0.0000,0.0000;
motionR: 0;
delta:null;
bokeh:0;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 247.49446;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 37;

यावेळी रमेश शिंदे, संजय शिंदे, रंगराव कांबळे, उल्हास भोसले, किरण भोसले, बाळासाहेब कांबळे, अनिल लोंढे, राजेंद्र प्रधान, बापूसो कांबळे, खंडेराव कांबळे, प्रमोद तिवडे, विनायक कांबळे, अमोल माने, सुरज कांबळे, कुमार कांबळे, डॉ. दगडू माने, अविनाश कांबळे, नंदकुमार गजरे, रामचंद्र कांबळे, शिवाजी कांबळे, बाळासाहेब चलवादे, खंडेराव हेरवाडे, सुधीर आदमाने आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…