Home Uncategorized संजीवन स्पोर्ट्स अकॅडमीमुळे कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकेल- मालोजीराजे छत्रपती.

संजीवन स्पोर्ट्स अकॅडमीमुळे कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकेल- मालोजीराजे छत्रपती.

3 second read
0
0
62

पन्हाळा प्रतिनिधी सचिन वरेकर
संजीवन स्पोर्ट्स अकॅडमी ला ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन च्या युथ लीग स्पर्धेमध्ये स्थान मिळाल्याने हा क्षण कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल. या स्पोर्ट्स अकॅडमीमुळे कोल्हापूरचे नाव निश्चितपणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकेल असा विश्वास के एस ए चे अध्यक्ष व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. ते ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन युथ लीग मध्ये संजीवन स्पोर्ट्स अकॅडमी ला स्थान मिळाल्याबद्दल या अकॅडमीच्या उद्घाटन सोहळ्याच्या समारंभापसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाला महिला वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षा मधुरिमा राजे छत्रपती, संजीवन चे चेअरमन पी आर भोसले, संजीवन चे क्रीडा विभाग चे प्रमुख सौरभ भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की संजीवन स्पोर्ट्स अकॅडमी च्या मुळे कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले जाईल तसेच यामुळे खेळाडूंना एक चांगली संधी देखील उपलब्ध झाली आहे. संजीवनीने फुटबॉल खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य या नमित्ताने केले आहे. छत्रपती घराण्याने नेहमीच कला व क्रीडा क्षेत्राला उभारी देण्याचे काम केले आहे. फुटबॉल क्षेत्रामध्ये जी काही शक्य होईल तेवढी मदत करण्याची गवाही यावेळी मालोजीराजे छत्रपती यांनी दिली.

यावेळी छत्रपती राजाराम महाराजांपासून कोल्हापुरात फुटबॉल खेळ हा रुजवला गेला आहे तोच वारसा पुढे मालोजीराजे व मधुरिमा राजे छत्रपती यांनी चांगल्या रीतीने चालवला आहे. छत्रपती घराण्याने फुटबॉल वाढविण्यासाठी फार मोठे योगदान दिले असून ते असेच पुढे चालू राहील. तीस वर्षात संजीवन चे विविध खेळ प्रकारात एक हजाराहून अधिक खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. संजीवनने शैक्षणिक क्षेत्रासोबतच क्रीडा क्षेत्राला देखील महत्त्व दिले आहे त्यामुळेच आज अत्यंत महत्त्वाची व मानाची मानली जाणारी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन च्या आयलिग स्पर्धेसाठी संजीवन स्पोर्ट्स अकॅडमी पात्र ठरली आहे. ही खरोखरच संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. या नमित्ताने फुटबॉल खेळाडूंना एक चांगली संधी मिळाली असून याचा निश्चितपणे भविष्यात खेळाडूंना फायदा होईल असे मत चेअरमन पी आर भोसले यांनी व्यक्त केले.

प्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मालोजीराजे छत्रपती व मधुरिमा राजे छत्रपती यांचे स्वागत व सत्कार चेअरमन पी आर भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित असणारे कोल्हापुरातील फुटबॉल खेळाडू प्रशिक्षक व विविध पदाधिकारी यांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला. मालोजीराजे छत्रपती व मधुरिमा राजे छत्रपती यांच्या शुभहस्ते संजीवन स्पोर्ट्स अकॅडमी चा लोगो, या संघाची जर्सी चे अनावरण करण्यात आले. यानंतर संजीवन स्पोर्ट्स अकॅडमीची तयार करण्यात आलेली चित्रफीत देखील मान्यवरांच्या समोर प्रदर्शित करण्यात आली.

चौकट. ज्याप्रमाणे आयपीएल च्या स्पर्धा खेळविल्या जातात त्याचप्रमाणे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या वतीने देखील फुटबॉल चे सामने खेळवले जातात. यामध्ये देशभरातील ज्यां संघांना स्थान या स्पर्धेमध्ये मिळाले आहेत असे संघ या स्पर्धा खेळतात. यामध्ये स्थान मिळवणे हे खरोखरच खूप अभिमानाची बाब असते. कोल्हापूर,सांगली,सातारा या तीन जिल्ह्यात प्रथमच हा मान संजीवन ला मिळाला आहे. त्यामुळे कोल्हापूर च्या फुटबॉल क्षेत्राला निश्चितच एक नवी दिशा मिळेल व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…