Home Uncategorized स्वयंभू श्री शिव गणेशाचे दर्शन घेऊन प्रशांत शहापूरे यांचा विकासाचा संकल्प

स्वयंभू श्री शिव गणेशाचे दर्शन घेऊन प्रशांत शहापूरे यांचा विकासाचा संकल्प

3 second read
0
0
27

शिरोळ : प्रतिनिधी

आलास जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी,जनतेच्या न्याय हक्कासाठी आणि सर्वसामान्यांच्या स्वाभिमानासाठी अखंडपणे लढण्याची शक्ती मिळावी, असे साकडे घालत जिल्हा परिषद मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रशांत शहापूरे यांनी गणेशवाडी येथील स्वयंभू श्री शिव गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले.
गुरुवारी प्रशांत शहापूरे यांचा उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत वैध ठरल्यानंतर त्यांनी श्री गणेश जयंतीचे औचित्य साधत गणेशवाडी येथील स्वयंभू श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मतदारसंघातील जनतेच्या विविध प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात मांडण्यासाठी आपण सज्ज असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.आलास जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमधील रस्ते विकास, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षण व्यवस्था, वीजपुरवठा, शेतीपूरक योजना, युवकांचे रोजगार प्रश्न, महिलांच्या सक्षमीकरणासह ग्रामीण विकासाशी संबंधित प्रत्येक मुद्द्याला प्राधान्य देऊन काम करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी मांडला. सर्वसामान्य नागरिकांचा आवाज कधीही दबला जाणार नाही,अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहून न्याय मिळवून देण्यासाठीच आपण जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माझी भूमिका, माझा विचार आणि माझे कार्य हे मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी मी स्वतःजनतेत जात आहे. जनतेचा विश्वास आणि पाठबळ हाच माझ्या कार्याचा खरा आधार आहे,असे मत प्रशांत शहापूरे यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध गावांतील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.धार्मिक श्रद्धा आणि विकासाचा राजकीय संकल्प यांची सांगड घालणाऱ्या या कार्यक्रमामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात सकारात्मक आणि उत्साही वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…