मलकापूर :
शाहू तरुण मंडळ प्रणित विघ्नहर्ता गणेश मंदिर, मलकापूर येथे गणेश जयंतीनिमित्त भव्य व भक्तिमय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मलकापूर नगरीचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणपतीचा जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.हा सोहळा गुरुवार, २२ जानेवारी २०२६ रोजी विघ्नहर्ता गणेश मंदिर, मलकापूर येथे संपन्न होणार असून सकाळपासून सायंकाळपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्सवाची सुरुवात सकाळी ८.३० ते १०.३० या वेळेत बाप्पाच्या मंगल महाअभिषेकाने होणार आहे. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात, भक्तीपूर्ण वातावरणात भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीनंतर मंदिर परिसरात भक्तिभावाने जन्मोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे.सायंकाळी ठीक ७.०० वाजता महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाहू तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.या पवित्र व मंगल प्रसंगी मलकापूर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होऊन विघ्नहर्ता गणपतीचा आशीर्वाद घेतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


