Home Uncategorized जाधव वाडी येथे श्री गणेश तरुण मंडळाच्या वतीने भव्य गणेश उत्सवाचे आयोजन

जाधव वाडी येथे श्री गणेश तरुण मंडळाच्या वतीने भव्य गणेश उत्सवाचे आयोजन

2 second read
0
4
85

जाधववाडी तालुका शाहूवाडी येथील श्री गणेश तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेशोत्सव २०२५ विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने मंडळाच्या वतीने नागरिकांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविक व ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शनिवार दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता महिलांसाठी हळदी-कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सत्यनारायण पूजा, दुपारी १ वाजता भव्य बैलगाडा शर्यत, सायंकाळी ६ वाजता महाआरती, सायंकाळी ७ वाजता महाप्रसाद, तर रात्री ९ वाजता ऑर्केस्ट्रा – किशोर कुमार म्युझिकल नाईट (कोल्हापूर) हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

सोमवार दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता जाधववाडीचा महाराजा (भव्य दिव्य विसर्जन सोहळा) संपन्न होणार असून यावेळी विशेष आकर्षण म्हणून श्री गणेश म्युझिकल बँजो पार्टी, नवे पारगाव यांचा कार्यक्रम होणार आहे.या उत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. श्री. विनयरावजी कोरे (सावकार) आमदार शाहूवाडी–पन्हाळा विधानसभा, मा. श्री. सर्जेराव पाटील (दादा) माजी बांधकाम सभापती जि. प. कोल्हापूर, मा. श्री. करणसिंह गायकवाड (बाळ) संचालक गोकुळ दूध संघ तसेच मा. श्री. जयंतरावजी काटकर माजी जि. प. सदस्य उपस्थित राहणार आहेत.

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्री गणेश तरुण मंडळ, जाधववाडी यांच्या वतीने करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणरायाच्या दर्शनाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.अशी माहिती अध्यक्ष शंकर बळवंत जाधव यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…