स्थानिक लोकांचा वाढता सहभाग आणि मागणी यानुसार येत्या २६ जून रोजी होणारी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची १४८वी जयंती त्यांनी उभारलेल्या धरणस्थळी राधानगरी येथे पुन्हा साजरी करण्यात येणार आहे. अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज राजे समरजितसिंह घाटगे यांनी राधानगरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले,मागील दोन वर्षे हा जयंती सोहळा लोकराजेंच्या कार्यस्थळी साजरी करून आम्ही नवा आदर्श पायंडा पडला आहे.दरवर्षी या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून छ.शाहू प्रेमी यावेत आणि त्यातूनच राधानगरी तालुका चांगले पर्यटन केंद्र म्हणून उदयाला यावे ही इच्छा आहे राधानगरी धरणस्थळी हा जयंती उत्सव साजरा करण्या मागील हेतू हाच आहे की राजर्षी शाहू महाराजांचे नातू, शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे नेहमी म्हणत असत की, राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांना आजच्या समाजाने जयंतीपुरते, पुतळा व प्रतिमापूजन यापुरते मर्यादित ठेवले आहे. मात्र त्यांचे कार्य इतके भव्यदिव्य आहे की ते संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरणारे आहे. हे कार्य जगासमोर आणता येईल अशा आदर्श पद्धतीने त्यांची जयंती झाली पाहिजे. याच दरम्यान महत्त्वाचे म्हणजे राधानगरीला अलौकीक निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभले आहे.जिल्ह्यातील पर्यटकांना नेहमीच याची भुरळ पडते. या निमित्ताने राधानगरी पर्यटक तालुका व्हावा, पर्यटन उद्योगातून स्थानिक नागरिकांनी चांगला रोजगार मिळावा हा उद्देश आहे.बहुजन समाजामार्फत संपन्न होत असलेला हा जन्मोत्सव सोहळा राजर्षी शाहू महाराजांचे विचार देशभर पोहोचतील या हेतूने भव्य दिव्य पद्धतीने करण्याचा मानस आहे. यासाठी परिसरातील स्थानिक लोकांनी पुढे येऊन हा सोहळा जणोत्सव म्हणून साजरा करावा ही इच्छा आहे. सकाळी १०वाजता, बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीतील जोडप्यांसह राजे समरजितसिंह घाटगे व सौ.नवोदिता घाटगे यांच्या हस्ते धरणातील पाण्याचे पूजन करून कलश जलाभिषेकसाठी आणून विधिवत पूजा करणेत येईल सकाळी १०.३० वाजता शाहूंच्या पुतळ्यास विधिवत जलाभिषेक,पुतळा पूजन व अभिवादन कार्यक्रम होईल. तरी शाहूप्रेमी सर्व नागरिकांनी या जन्मोत्सव सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ नवोदिता घाटगे, संघटनमंत्री नाथाजी पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष संभाजी आरडे,दीपक शिरगावकर सचिन जाधव, सचिन वासुदेव, विलास रणदिवे आदी उपस्थित होते. चौकट घाटगे म्हणाले,छ.शाहु महाराज जन्मोत्सव सोहळा या ठीकाणी साजरा करण्याची संकल्पना माझी नाही.तर राधानगरी परिसराच्या वाडीतील एका धनगराने मला ती सुचवली.जन्मोत्सव समितीने मला व पत्नी नवोदिता घाटगे यांना उपस्थित राहण्याबद्दल विनंती केली.त्यानुसार आम्ही सलग दोन वर्षे या जयंती सोहळ्यास येतआहोत. त्यामुळे बहुजन समाजाचा हा जन्मोत्सव सोहळा राजर्षी शाहू महाराजांचे विचार देशभर पोहोचतील अशा भव्य दिव्य पद्धतीने व्हावा ही इच्छा आहे. कोल्हापुरी कारभारसाठी प्रतिनिधी मिलिंद कांबळे
Home वायरल लोकराजा राजर्षी छ. शाहू महाराज यांची १४८ वी जयंती यावर्षीही राधानगरी धरणस्थळी साजरी करणार: राजे समरजितसिंह घाटगे
Check Also
मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..
जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…


