Home Uncategorized जाधववाडी येथे भव्य बैलगाडा शर्यत उत्साहात संपन्न

जाधववाडी येथे भव्य बैलगाडा शर्यत उत्साहात संपन्न

4 second read
0
0
60

मलकापूर प्रतिनिधी :

जाधववाडी (ता. शाहूवाडी) येथे श्री गणेश तरुण मंडळाच्या वतीने आयोजित गणेशोत्सव २०२५ अंतर्गत रविवारी दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी भव्य बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडली. या शर्यतीसाठी परिसरासह पंचक्रोशीतील बैलगाडा चालक व शौकिनांनी मोठी उपस्थिती लावली होती.या स्पर्धेत एकूण ४१ बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता. शर्यतीचे अंतर डबल मार्गे एक किलोमीटर इतके होते.

चुरशीच्या व रोमहर्षक लढतीतप्रथम क्रमांक – रोहित वीरेंद्र सावंत (पाली),द्वितीय क्रमांक – पांडुरंग विष्णू पाटील (आंबा),तृतीय क्रमांक – बाबा शेठ गांधी (भांबेड),चतुर्थ क्रमांक – आबासाहेब पाटील (ससेगाव),पाचवा क्रमांक – प्रथमेश बापू शेलार (शेलारवाडी)यांनी पटकावला.विजेत्यांना आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

प्रथम बक्षीस फ्रिज सागर दिनकर जाधव यांच्यामार्फत,द्वितीय बक्षीस टीव्ही मोहन बंडू जाधव यांच्यामार्फत,तृतीय बक्षीस कुलर लक्ष्मण पांडुरंग खाडे यांच्यामार्फत,चतुर्थ बक्षीस प्युरिफायर अशोक मारुती जाधव यांच्यामार्फत,तर पाचवे बक्षीस गिझर राजेश विलास जाधव यांच्यामार्फत देण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. विनय कोरे (आमदार, शाहूवाडी–पन्हाळा विधानसभा), मा. सर्जेराव पाटील (माजी बांधकाम सभापती), मा. करणसिंह गायकवाड (संचालक, गोकुळ दूध संघ) आणि मा. जयवंतराव काटकर (माजी जिल्हा परिषद सदस्य) उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अध्यक्ष शंकर जाधव, उपाध्यक्ष उदय थोरवत, माजी उपसरपंच संदीप जाधव, पोलीस पाटील बापू जाधव, युवराज जाधव, सुरेश जाधव तसेच सूत्रसंचालन करणारे संभाजी पाटील सुपात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम शांततेत व यशस्वीरीत्या पार पडला.

oppo_0

पारंपरिक खेळांचे जतन व ग्रामीण संस्कृती जपण्यासाठी अशा बैलगाडा शर्यती महत्त्वाच्या असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. श्री गणेश तरुण मंडळाच्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे अभिनंदन केले.

oppo_0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मलकापूर येथे एस.टी. बसथांबा व रात्री १० वाजेची बससेवा सुरू करण्याची मागणी

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते: मलकापूर शहरातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, महिला व ज्येष…