Home Uncategorized तोडगा निघेपर्यंत ऊस तोड बंद : युवा ऊस उत्पादकांचा निर्णय.. सोमवारी 11 वाजता तहसीलदार कार्यालयावर मोर्चा… शिरोळ गाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद…

तोडगा निघेपर्यंत ऊस तोड बंद : युवा ऊस उत्पादकांचा निर्णय.. सोमवारी 11 वाजता तहसीलदार कार्यालयावर मोर्चा… शिरोळ गाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद…

3 second read
0
0
26

शिरोळ : प्रतिनिधी

शिरोळ गावात ऊस दराच्या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केलेले आहे. आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांना ऊस दराचे आंदोलन करत असताना कारखाना समर्थकांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ आज १ नोव्हेंबर रोजी शिरोळ गाव बंद पुकारण्यात आला होता. या बंदच्या आवाहनाला शिरोळ गावातील नागरिक व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. संपूर्ण शिरोळ गाव कडकडीत बंद पाळण्यात आले.

त्यातच आज सकाळी ११ वाजता शिरोळ व परिसरातील युवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची छ. शिवाजी तख्त शिरोळ येथे बैठक आयोजित केली होती. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, आंदोलन अंकुश चे धनाजी चुडमुंगे, स्वाभिमानीचे सौरभ शेट्टी, यशवंत उर्फ बंटी देसाई, दिपक पाटील, राकेश जगदाळे, प्रदीप जाधव, धिरज शिंदे, सचिन सूर्यवंशी, महेश जाधव यांनी आपापले विचार व्यक्त केले.

यावेळी एक मुखाने ऊस दराचा तोडगा निघे पर्यंत सर्व ऊस उत्पादक शेतकरी, पक्ष, संघटना यांनी एकत्र येऊन सर्व ऊस तोंडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसीलदार कार्यालयापर्यंत सर्व उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. धनाजी चुडमुंगे यांना झालेल्या मारहानीचा यावेळी निषेध करण्यात आला.

यावेळी मा.आ.उल्हास दादा पाटील म्हणाले, आंदोलन कोण करालंय याला महत्व नाही, तर आंदोलन कश्यासाठी व्हायलंय याला महत्व आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा ऊस आंदोलनाचा लढा द्यायचा आहे. त्याचबरोबर चुडमुंगे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जाहिर निषेध करून, ही घटना अतिशय चीड आणणारी आहे. कारखाना व्यवस्थापनाने मारहाण करायला रस्त्यावर यायचं काही कारण नाही, त्यांनी त्यांचं काम कारखान्याच्या मिटिंग हॉल मध्ये करावं असंही ते म्हणाले.

प्रगतशील शेतकरी बंटी देसाई म्हणाले, स्वाभिमानी व अंकुश या दोन्ही संघटनानी एकत्र येऊन समस्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढा देण्याची गरज आहे. आम्ही ऊस उत्पादक शेतकरी तुमच्या मागे ठाम आहे. मतदारांना पैसे वाटताना कारखानदारांची इर्षा असत्या, उसाचे पैसे देताना मात्र ही इर्षा कुठे जात्या. सगळ्या कारखान्यांची रिकव्हरी, तोडणी वाहतूक वेगळी असताना एकच दर यांचा निघतोय कसा…?

स्वाभिमानीचे युवा नेते सौरभ शेट्टी यावेळी बोलताना म्हणाले, काल झालेली घटना म्हणजे बऱ्याच वर्षानंतर दंडूकशाहीचा पुरावा पुन्हा एकदा दिसून आला आहे, आणि तो जर थांबवायचा असेल तर, पुन्हा एकदा सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा लढा लढण्याची गरज आहे.

आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दिपक पाटील यावेळी बोलताना म्हणाले, चळवळ करत असताना कारखानदारांचा हेतू साध्य होऊ नये, यासाठी आम्हाला उलटा हात उचलता येतो नाही. नाहीतर हात उचलणं आम्हाला पण काय अवघड नाही.

धनाजी चुडमुंगे यावेळी बोलताना म्हणाले, “कारखान्याच्या संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. कारखान्यातून मिळणारे सर्व फायदे घेण्याचे बंद करावे. आणि मग आम्हाला चौकात सांगायला यावे की, आम्हाला हा दर परवडतोय” तर आम्ही मान्य करू. बगलबच्चानी स्वतः कारखान्याचा फायदा घ्यायचा आणि शेतकऱ्याची गळचेपी करायची हे चालणार नाही. जो जो या ऊस दराच्या आडवा येतोय तो खरा शेतकरीच नाही.
यावेळी मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी व नागरिक उपस्थित होते.शेवटी आभार युवा शेतकरी सचिन देशमुख यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…