Home Uncategorized शिरोळ मधील सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून महाराष्ट्र बंदला पाठिंबा…

शिरोळ मधील सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून महाराष्ट्र बंदला पाठिंबा…

3 second read
0
0
87

शिरोळ : मराठा समाजास आरक्षण मिळावे याकरिता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शिरोळवासीयांनी आपले सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे शहरात दिवसभर शुकशुकाट जाणवत होता.

गेल्या चार दिवसापासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाच्या विरोधात पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी अंतरावली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले. यामुळे मराठा समाजात शासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपात भावना व्यक्त होत आहे. हे आंदोलन तीव्र करण्यासाठी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला सर्वत्रच प्रतिसाद मिळाला.

शिरोळ शहरातील व्यापारी, नागरिक, उद्योजक यांनी आपले व्यवहार दिवसभर बंद ठेवून महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकान बंद होती. त्यामुळे शहरात सर्वत्र सामसूम दिसत होती. गजबजलेला संभाजी चौक, शिवाजी चौक, बसस्थानक परिसर, तहसील कार्यालय या ठिकाणी शुकशुकाट जाणवत होता. दिवसभर रस्त्यावर तुरळक वाहनांची वर्दळ सुरू होती. पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी येथील शिवाजी चौकात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. शिरोळमध्ये महाराष्ट्र बंद शांततेत पण उत्स्फूर्तपणे पाळण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…