Home Uncategorized शिरोळात शनिवारी यादव प्रेमी युवा मंच्चच्या वतीने तालुक्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी सोहळ्याचे आयोजन

शिरोळात शनिवारी यादव प्रेमी युवा मंच्चच्या वतीने तालुक्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी सोहळ्याचे आयोजन

3 second read
0
0
166

शिरोळ : कुणाल कांबळे
शिरोळ येथील यादव प्रेमी युवा मंचच्या वतीने शिरोळातील दहीहंडी सोहळ्याचे जनक स्व. शिवाजीराव यादव यांच्या स्मरणार्थ शनिवार (दि. ३१) रोजी सायंकाळी ६ वाजता शिरोळ येथील पद्माराजे विद्यालयाच्या क्रीडांगणावर सर्वात मोठ्या दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडी फोडणाऱ्या पुरुष गोविंदा पथकास १,११,७७७ रुपये रोख रक्कम आणि पाच फुटी कायम चषक, तर महिला गोविंदा पथकास ५१ हजार रुपयांचे रोख रकमेचे पारितोषिक दिले जाणार आहे, अशी माहिती यादव प्रेमी दहीहंडी महोत्सवाचे संयोजक भालचंद्र ठोंबरे यादव प्रेमी युवा मंचचे अध्यक्ष अजित देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी बोलताना भालचंद्र ठोंबरे व अजित देशमुख म्हणाले की, युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली यादव प्रेमी युवा मंचच्या वतीने गोकुळाष्टमीनिमित्त प्रत्येक वर्षी दहीहंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते. मुंबईतील कलाकारांचा डान्स शो आयोजित करण्यात आला आहे. दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी महिला प्रेक्षकांसाठी स्वतंत्र गॅलरी तयार करून बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. या दहीहंडी सोहळ्यासाठी कर्नाटक राज्याच्या महिला व बाल विकासमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, अभिनेत्री अनुष्का पिपूंटकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रथमच महिलांचा दहीहंडी सोहळा

यादव प्रेमी युवा मंचच्या वतीने शिरोळ तालुक्यात प्रथमच महिला गोविंदा पथकांना निमंत्रित करून महिला दहीहंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याकरिता अनेक शहरातील महिला गोविंदा पथक येणार आहेत. तसेच परिसरातील महिलांना तालुक्यातील सर्वात मोठा दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी पद्माराजे विद्यालयाच्या क्रीडांगणावर स्वतंत्र गॅलरी निर्माण करून त्यांची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे परिसरातील महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा विश्वास भालचंद्र ठोंबरे यांनी बोलताना व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…