Home Uncategorized कुंभोजमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ध्वजारोहण व भव्य रॅली

कुंभोजमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ध्वजारोहण व भव्य रॅली

2 second read
0
0
164

कुंभोज : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि ‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्त ‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत कुंभोज ग्रामपंचायतीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साह, देशभक्ती आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला. सकाळी ग्रामपंचायत आवार देशभक्तीपर गीतांनी व ‘भारत माता की जय’ घोषणांनी दुमदुमून गेला.

कार्यक्रमाचे औचित्य साधत ध्वजारोहण माजी सैनिकांच्या पत्नी श्रीमती उषा विठ्ठल कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.

यानंतर गावातील प्रमुख मार्गांवरून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. शाळकरी मुली, महिला मंडळे, युवक संघटना, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होत हातात तिरंगा घेऊन व देशभक्तीपर घोषणा देत संपूर्ण गाव देशभक्तीच्या रंगात न्हावून निघाले.

रॅलीत सरपंच सौ.जयश्री महापुरे,
उपसरपंच आप्पासाहेब पाटील, गटनेते किरण माळी, जवाहर साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब चौगुले, राजाराम साखर कारखान्याचे संचालक अमित साजनकर, अजित देवमोरे, ग्रामविकास अधिकारी सुषमा कांबळे, सदानंद महापुरे, संभाजी मिसाळ, भरतेश्वर भोकरे, भारती पोतदार, शुभांगी माळी, माधुरी घोदे, जयश्री जाधव, अशोक आरगे, सुदर्शन चौगुले, पोलीस पाटील मोहम्मद पठाण, अमोल गावडे, संभाजी चव्हाण, दीपक कोळी
माजी सैनिक राजाराम तिवडे, श्रीपाल कोळी, भानुदास वाघमारे, उत्तम खोत,आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी सरपंच सौ. जयश्री महापुरे म्हणाल्या, “तिरंगा हा आपल्या स्वातंत्र्य, ऐक्य आणि अभिमानाचे प्रतीक आहे. तो आपल्या प्रत्येकाच्या हृदयात कायम फडकत राहावा, हीच खरी देशसेवा आहे.”

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत सदस्य, कार्यालयीन कर्मचारी, स्थानिक संघटना व नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले. गावकऱ्यांनी हा दिवस देशभक्तीचा उत्सव म्हणून साजरा करत स्मरणीय ठरवला.

केके न्यूज हातकणंगले प्रतिनिधी : सचिन लोंढे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…